आग्रा सुटका मोहिम बाईकरॅलीचे आज येवल्यात आगमन.... टिळक मैदानावर संध्याकाळी जाहिर सभा.. ..

आग्रा सुटका मोहिम बाईकरॅलीचे आज येवल्यात आगमन....                       

टिळक मैदानावर संध्याकाळी जाहिर सभा.. ..      


येवला . प्रतिनिधी

 शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटका मोहिमेला ३५१ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने श्री राजगड ते आग्रा अशी बाईक रॅलीचे आज रविवार दि. ११ नोव्हेंबर रोजी संध्या ७ः०० वाजता येवला शहरात आगमन होणार असून डॉ. संदिप महिंद गुरुजी यांची ७ :३० वाजता टिळक मैदान येवला येथे जाहिर सभा होणार आहे तरी जास्तीत जास्त शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहान विविध छत्रपती शिवाजी महाराज प्रणित संघटनांकडून करण्यात आले आहे.

१७ ऑगस्ट १९४६ ला औरंगजेबाच्या मगरमिठीतून अतिशय धोरणी कौशल्याने छत्रपतींनी स्वताःची सुटका करुन घेत २५०० किमीचा प्रवास करत पूण्यात व राजगडावर पोहचले होते. या तेजस्वी घडणेचा जागर करायचा म्हणून राजगड ते आग्रा अशी शेकडो बाईकस्वारांच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०१८ या कालावधीत  १४ राज्ये, ९१ जिल्हे, ३३ तिर्थक्षेत्र, ५० किल्ले, व १०३ जाहिर सभांचे आयोजन करीत हि बाईक रॅलीचे येवला शहरातुन जाणार असुन रविवारी संध्या ७ वाजता विंचूर चौफूली येवला येथे दाखल होत असुन येवलावासियांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार असुन संध्या.७ः ३० वाजता टिळक मैदानावरिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन छत्रपती शिवरायांच्या जिवन चरित्रावर डॉ. संदिप मंहिंद गुरुजी यांचे जाहिर व्याख्यान होणार आहे. रायगड ग्रुप कार्यकर्त्याच्या माध्यमातुन शेकडो बाईकरॅलीस्वारांची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

 टिळक मैदानावर होणाऱ्या जाहिर सभेस येवला शहरातील व तालूक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी आर्वजुन उपस्थित राहणार असुन जनतेनेही मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रायगड ग्रुप, शिवभारत आयोजन समिती, छावा संघटना, मराठा मावळा संघटना, संभाजी ब्रिग्रेड, या संघटनासह समस्त शिवप्रेमी येवला शहर व तालूका यांनी केले आहे.                    

 आग्रा सुटका मोहिम बाईक रॅलीचे स्वागत व जाहिरसभा यशस्वी करण्याचा निर्धार अॅड.शाहुराजे शिंदे, संभाजी पवार, कृणाल दराडे, प्रविण बनकर, संजय सोमासे, अरविंद शिंदे, भागुनाथ उशीर, सुनिल गायकवाड, अविनाश शिंदे, नानासाहेब लहरे, नितिन जाधव, प्रकाश गुडघे, पुरुषोत्तम राहणे, गोरख आहिरे, संपतराव कदम, बापूसाहेब शेलार, रविंद्र पगार, सागर शेलार, विलास आण्णा ठोमसे, गोरख संत, विठ्ठल शिंदे, संजय पवार, सुदाम पडवळ, रवि शेळके, देविदास गुडघे,साईनाथ भुजाडे, आंबादास कदम, डॉ. बाबासाहेब खैरणार, सागर नाईकवाडे, कृष्णा राठोड, साईनाथ मढवई, आदित्य नाईक, प्रमोद देव्हडे,श्रीकांत जाधव, संदिप बर्शिले,शाम शिंदे, भगवान शिंदे, दत्तात्रय खडके, आण्णा आहेर, शरद बोरनारे, दत्तात्रय वाणी, राजेंद्र गायकवाड, जालींद्र कांडेकर, नरेंद्र चव्हाण, गणेश लहरे आदिंनी व्यक्त केला आहे.
थोडे नवीन जरा जुने