अभिनव शाळेत बालवारकऱ्यांची दिंडी

अभिनव शाळेत बालवारकऱ्यांची दिंडी

येवला : प्रतिनिधी
शहरातील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, अभिनव बालविकास मंदिर शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी काढण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक  सुदर्शन जाधव यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. दिंडीत विठ्ठल-रखुमाई तसेच वारकऱ्यांची वेशभूषा केलेली बालके लक्ष वेधून घेत होती. टाळ व विठुरायाच्या नामघोषाच्या गजरात डोक्यावर तुळशी वृंदावन व कलश घेऊन दिंडीने परिसरात प्रदक्षिणा केली. परिसरातील महिलांनी पालखीचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी दिंडीत उत्साहाने भाग घेऊन शालेय आवार टाळ-मृदंगाच्या गजराने दुमदुमून टाकले. गिरीशा भामरे, प्रियंका सोमासे व तुषार भामरे  यांनी नियोजन केले. यावेळी वाल्मिक जाधव, बालू गोरे, सीमा जाधव, हंसाबाई परदेशी, जयश्री देशमुख, रुपाली गायकवाड, उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने