पारेगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन :कृषी विभागाचा पुढाकार

पारेगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन :कृषी विभागाचा पुढाकार
येवला . प्रतिनिधी
तालुका कृषी विभागाच्या वतीने पारेगाव येथे संध्या मका पिकावर आलेल्या अमेरिकन लष्करी नायनाट करण्यासाठी कोणत्या प्रकारची फवारणी करावी,एकूणच संध्याच्या हंगामातील पिकांचे अधिक दर्जेदार संगोपन कसे करावे,यावर आधारित मार्गदर्शन येथील शेतकऱ्यांना येवला तालुका कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक अर्चना ठुबे यांनी मार्गदर्शन केले,शेतकऱ्यांनी आजच्या काळात सतर्क राहायला हवं एक एकर शेतीच्या परिसरात किमान १० ते१२ पक्षी थांबे उभारणे गरजेचे असल्याचे ठुबे यांनी सांगितले.शासनाने शेतकऱ्यांसाठी पीक विमा यासारखी अत्यन्त प्रभावी योजना सुरु केली असून त्या योजनेची सविस्तर माहिती देत कृषी विभागाने पीक विमा माहिती पत्राचे वाटप उपस्थित शेतकऱ्यांना केले.पारेगाव येथील मारुती मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अप्पा बंड, बापूसाहेब पोटे,माधव काळे,,माधव गवळी, ,दत्तात्रय कोरहाळे,,गोटीराम पाठे,बबन कुमावत,नितीन पाटोळे,संतोष गलांडे,ऋषिकेश खिल्लारे,सुनील कुमावत,बंडू ढगे,पंढरीनाथ कोरहाळे,देविदास ढगे,वसंत बंड,एकनाथ कोरहाळे सौरभ कुमावत,कुणाल जाधव ,घनश्याम बंड,रमेश पाठे,जवाहरलाल भोसले, आदींसह .शेतकरी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने