बंधा-यातील गाळ उपसल्याने मिटणार जऊळकेकरांचा पाणिप्रश्न. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा फायदा. जळगांव नेऊरः वार्ताहर
जउळके (ता.येवला) येथील गावालगत असणा-या दोनही बंधा-यांचा गाळ उपसल्याने बंधा-यांची खोली वाढली आहे.यामुळे यंदाच्या पावसाळ्यात बंधारा भरल्यानंतर गावाबरोबरच आसपासच्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे.शासनाच्या" जलयुक्त शिवार,गाळमुक्त धरण"या योजनेअंतर्गत युवामिञ व टाटा फाउंडेशन तर्फे येवला तालुक्यातील अनेक बंधा-यांचा गाळ उपसण्यात आलेला आहे.जऊळके येथेही युवामिञ संस्थेतर्फे बंधा-यांचा गाळ उपसण्यात आलेला आहे.यामुळे अनेक वर्षांपासुन वाहुन जाणारे पाणी बंधा-यांत साठल्याने त्याचा फायदा गावक-यांना होणार आहे.तसेच उपसलेला गाळ अनेक शेतकऱ्यांनी वाहुन आपल्या शेतात टाकल्याने जमिनीचाही पोत सुधारणार आहे.जऊळके ग्रामपंचायतीच्या सरपंच हिराबाई धाञक,उपसरपंच बाळासाहेब गवंडी तसेच सदस्य उमाजी पवार,दिपाली जाधव,परशराम खैरनार,वाल्ह्याबाई सोनवणे,शारदा खैरनार ,भावराव जाधव,शालिनी वाळके यांच्या जोरदार प्रयत्नांना अखेर यश आले आहे.या अगोदर बंधा-यांच्या अपुऱ्या साठवण क्षमतेमुळे जवळपास बरेचसे पाणी वाहुनच जायचे.त्यामुळे उन्हाळ्या अगोदरच जऊळके ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.परंतु आता वाढणाऱ्या पाणीसाठ्यामुळे गावातील विहीर तसेच बोअरवेलला जास्त काळ पाणी टिकणार आहे.याबाबत ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले आहे.
प्रतिक्रीया-"गावालगतच्या बंधा-यांचा गाळ उपसल्याने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचाही प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे."हिराबाई धाञक,सरपंच ग्रा.प.जऊळके.
जऊळकेः गावालगतच्या बंधा-यांचा गाळ मोठ्या प्रमाणात उपसण्यात आल्याने वाढलेले खोलीकरण.छाया.(राधु शिरसाठ)