खटपट युवा मंचच्या वतीने रायते जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप...शाळेत वृक्षारोपण
येवला : प्रतिनिधी
येथील खटपट मंचच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्ताने रायते येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप तसेच अतिदुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र नाशिक सलग्न खटपट मंचच्या वतीने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप देवरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, भूषण गोठी, प्रसाद भडांगे, लक्ष्मण जुन्नरे, सौरभ घोडके, विशाल चंडालिया, गौरव अधिकार, सिद्धार्थ घोडके उपस्थित होते. यावेळी प्रभाकर झळके यांनी विद्यार्थ्यासमोर जादूचे प्रयोगाचे सादरीकरण केले. तसेच त्यांनी या माध्यमातून विद्यार्थांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार मुकेश लचके यांनी केले.तसेच मुकेश लचके यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शेख नजीरमिया यांनी केले. तर आभार मुकेश लचके यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. पैठणकर, अनिल मढवई, सखाहरी वाडेकर, संजय मढवई, संदीप भांबारे, वरद लचके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=========================================
फोटो कॅप्शन -
83 - शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करताना व्यंगचित्रकार प्रभाकर झळके समवेत मुकेश लचके, सौरभ घोडके आदि.
85 - विद्यार्थ्यांना मिठाई व गणवेशाचे वाटप प्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी