पथनाट्याच्या माध्यमातून केली महामानवाची जयंती साजरी

पथनाट्याच्या माध्यमातून केली महामानवाची जयंती साजरी 

येवला : पुढारी वृत्तसेवा

सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व इकरा अरबी मदरसा शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले सदर  पथनाट्य येवले शहरातील विंचूर चौफुली व मुक्ती भूमी येथे सादर करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार नरेंद्र दराडे , बाळासाहेब कर्डक,प्राचार्य जितेश पगारे, डॉक्टर सुधीर जाधव, संजय पगारे, सचिन सोनवणे, शेरूभाई मोमीन, अजहर शाह,  सुभाष गांगुर्डे, महेंद्र पगारे ,अजिज शेख, रंजना पठारे, विजय घोडेराव, संजय गांगुर्डे, सविता धीवर, दयानंद जाधव, राहुल वाघ, समीर देशमुख, राजेंद्र गणोरे, सुरेश गोंधळी, आदींसह इतरही मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून 131 वी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात माहिती अधिकाराला आधारित मेरे सपनो को जानने का हक है. हे गीत सादर करुन करण्यात आली त्यानंतर संविधानाच्या 74 व्या घटना दुरुस्ती मध्ये जे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदान करण्यात आले त्यावर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे पथनाट्य करून लोकांना मोहल्ला सभा या अधिकारांबद्दल माहिती दिली प्रत्येक प्रभागात एका नगरसेवकाने किमान दोन वर्षात चार वेळा मोहल्ला सभा चे आयोजन करायला हवे जर अशा प्रकारच्या सभा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी टाळाटाळ करत असेल तर त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात चे अधिकार सन 1992 च्या 74 व्या घटना दुरुस्ती अंतर्गत प्राप्त झाले आहे याबद्दल विद्यार्थ्यांनी केलेल्या पथनाट्य यामुळे लोकांना साध्या सोप्या भाषेत संविधान समजले डॉक्टर केदारे यांनी विद्यार्थ्यांना 200 रुपयाचे बक्षीस दिले याप्रसंगी उपस्थितांनी आयोजकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले सदर कार्यक्रमात विद्यार्थी इकरा शहा, जीनत शेख ,नर्गिस शेख ,सारा शेख ,रूमेजा मोमीन ,शफक मंसूरी, जिकरा शहा, जीशान शेख, समीम शेख, सुफीयान अन्सारी, यांनी पथनाट्य सादर केले तसेच संविधानाची प्रास्ताविका रुफैजा मन्सुरी आणि आकिब अन्सारी यांनी सादर केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी जगदाळे, शबिस्ता मंसुरी, आफिया अन्सारी, निदा घासी,असद अन्सारी सहा आदींनी परिश्रम घेतले
थोडे नवीन जरा जुने