चिंचोडी येथून ट्रॅक्टर ट्रॉली चोरी

चिंचोडी येथून ट्रॅक्टर ट्रॉली चोरी


येवला :  पुढारी वृत्तसेवा
अस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत जगणारा बळीराजा आता चोरट्यांच्या भीतीने धास्तावला आहे हत्तीसारखा ट्रॅक्टर चोरी जाण्याच्या घटना आता वाढीस लागली आहे, येवला तालुक्यातील चिंचोडी खुर्द येथून मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर व त्यासोबत असलेली ट्रॉली चोरीला गेली असून इतके मोठे वाहन चोरीला गेल्याने खळबळ उडाली  आहे या प्रकरणी येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत
याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील चिंचोडी खुर्द येथील आण्णासाहेब भास्कर मढवई हे कुटूंबासह वस्तीवर रहातात दिनांक १५ एप्रिलच्या मध्यरात्री कुटूंबीय गाढ झोपेत असताना चोरट्यांनी त्यांचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच १५ ई एस ४२११ व त्यासोबत असलेली ट्रॉली चोरून नेली  आण्णासाहेब मढवई यांनी शेती कामाच्या वापरासाठी भाऊसाहेब रोकडे यांच्याकडून आयशर कंपनीचा ३६८ मॉडेलचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच १५ ई एस ४२११ विकत घेतला होता तसेच जय भवानी, मनमाड यांचे कडुन हायड्रोलीक दोन चाकी ट्रॉली घेतली असुन घटनेच्या रात्री पाटोदा येथुन घरी आलो असता घरासमोर अंगणात दोन्ही वाहने लावलेली होती नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता उठलो असता अंगणात ट्रॅक्टर ट्रॉली दिसली नाही ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चोरीच्या या घटनेत ०१ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व ५० हजार रुपये किमतीची ट्रॉली असा एकूण १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल
अज्ञात चोरट्याने चोरुन नेला असून याबाबत येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत
थोडे नवीन जरा जुने