*होरायझन अकॅडमीत 'आरंभ' महोत्सवातून महाराष्ट्र संस्कृतीचा वारसा उलगडला*

*होरायझन अकॅडमीत 'आरंभ' महोत्सवातून महाराष्ट्र संस्कृतीचा वारसा उलगडला*

  मविप्र संचलित होरायझन अकॅडमी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन ' आरंभ_ सेलिब्रेटिंग महाराष्ट्र संस्कृतीचा महोत्सव ' या वैशिष्ट्यपूर्ण थीमवर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वल व प्रतिमापूजनाने झाले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर मविप्र येवला तालुका संचालक नंदकुमार बनकर, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे, शशिकांत मोगल, नायब तहसीलदार पंकज नेवसे, महेंद्र गांगुर्डे, कापसे पैठणी संचालक दिलीप खोकले, ॲड. साहेबराव कदम, ॲड. बाबासाहेब देशमुख, प्रविण बनकर, प्रविण गायकवाड, भूषण शिनकर, रामदास काळे,अशोक शिंदे, ॲड. तुषार सोमवंशी, ॲड. किरण देशमुख, कैलास देशमुख, प्राचार्या सुनिता हिंगडे मंचावर उपस्थित होते. 


        विद्यार्थ्यांनी गणेशवंदना, कोळीगीत, सण_उत्सव, आदिवासी गीत, महाराष्ट्राचा गौरव, छावा, गौरी गणपती, एकादशी वारी, जागरण गोंधळ, अशा विविध सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरा, लोककला, सांस्कृतिक वारसा आणि "संस्कृतीचे" दर्शन घडविले. प्री _ प्रायमरीच्या चिमुकल्यांचे सादरीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण ते राज्यभिषेक सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. अंगावर शहारे आणणाऱ्या या सादरीकरणास उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. 


        संचालक नंदकुमार बनकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असे मत व्यक्त केले. तसेच पालकांचेही आभार मानले. 

      याप्रसंगी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते तसेच मविप्र संस्थेच्या येवला तालुक्यातील शाखाप्रमुख महाले सर, पाखले सर, भगत सर, शिंदे सर, सोनवणे सर यांनी उपस्थिती दर्शविली. 

          अंबादासजी बनकर, पंकज नेवसे, डॉ. कैलास शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

         प्राचार्य सुनिता हिंगडे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानदा लांडगे व समीक्षा खोकले या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. 

          कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणी पर्यंत शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी आपापल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्या संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पार पडला. उपस्थित पालक व पाहुण्यांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने