वारकरी संप्रदाय ही समतेची चळवळ प्रा ज्ञानेश्वर दराडे

वारकरी संप्रदाय ही समतेची चळवळ प्रा ज्ञानेश्वर दराडे

 पाटोदा येथे मान्यवरांचा सर्वपक्षीय सत्कार

येवला: पुढारी वृत्तसेवा

संतांनी रोटी व्यवहार घडवून बहुजन समाजात समता निर्माण केली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न केले संत ,छत्रपती शिवाजी महात्मा,ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज,महाराजा सयाजीराव गायकवाड,डॉ बाबासाहेब आंबेडकर ही मानवतेच्या विचारधारेची शृंखला असून मानवतेचा समतेचा विचार हाच या परंपरेचा धागा आहे मानवतेचे हे विचार बहुजन समाजाने अंगिकारले पाहिजे असे प्रतिपादन समता परिषद जिल्हाध्यक्ष प्रा ज्ञानेश्वर दराडे यांनी तालुक्यातील पाटोदा येथे  केले समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल करण्यात आलेला सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते सूर्यभान नाईकवाडे होते
संत तुकारामाचे अभंग ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे दाखले देत प्रा ज्ञानेश्वर दराडे यांनी वारकरी संप्रदायाचे व पुरोगामी विचारांचे नाते स्पष्ट केले
याप्रसंगी वारकरी भूषण पुरस्कार प्राप्त ह भ प विठ्ठलराव शेलार यांचा सत्कार करण्यात आला यापुढे आपण पूर्ण धर्मकार्याला वाहून घेणार असून आपण निवडणुका करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सरपंच दत्तू डुकरे यांचा ही यावेळी सन्मान करण्यात आला विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे भुजबळ साहेबांनी मतदारसंघाला मोठा निधी दिला असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर शेवाळे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ऍड समीर देशमुख पाटोदा वि का सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल  प्रशांत बोरणारे व्हा चेअरमान पदी निवड झाल्याबद्दल कैयुमभाई देशमुख व ग्रामपंचायत च्या प्रभारी सरपंच पदी निवड झाल्याबद्दल रईस भाई देशमुख आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला समीर देशमुख ज्ञानेश्वर शेवाळे यांनी यावेळी सत्कार केल्याबद्दल आभार मानले
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे पशु व संवर्धन विभागाचे सभापती श्री संजय बनकर पंचायत समितीचे माजी सद्स्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते डॉ मोहन शेलार युवा सेनेचे राज्य विस्तारक कुणाल दराडे बाजार समितीचे संचालक साहेबराव आहेर माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पिंपरकर शिवसेनेचे तालुका प्रमुख रतन बोरणारे माजी संचालक अशोक मेंगाने भगवान ठोंबरे रऊफ मुलांनी अंकुश बोराडे यांनी मनोगत  व्यक्त केले याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अंकुश बोराडे यांनी सूत्रसंचालन तर साहेबराव आहेर यांनी आभार मानले
थोडे नवीन जरा जुने