एकलहरे येथील मातोश्री व्यवस्थापन महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा

एकलहरे येथील मातोश्री व्यवस्थापन महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा


येवला : पुढारी वृत्तसेवा
एकलहरे येथील मातोश्री व्यवस्थापन महाविद्यालय व संशोधन केंद्र येथे विद्यार्थी विकास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियाना राबविण्यात आले.
याअंतर्गत विद्यार्थीनींसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान व कराटे स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 
प्रारंभी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. योगेश गोसावी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.या प्रसंगी श्रीमती राजश्री जानोरकर यांनी कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार कसे रोखता येतील हे स्पष्ट केले.या संबंधी विविध कायद्यांची माहिती दिली.कराटे प्रशिक्षक सुहास मैंद यांनी कराटेद्वारे स्वतःचे रक्षण करता येते,त्यासाठी सक्षम असणे गरजेचे आहे असे सांगत प्रात्यक्षिक दाखवले व महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. 
प्राचार्य डॉ.गोसावी यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचा विद्यार्थिनींनी फायदा घ्यावा असे सांगितले.विद्यापीठ असे विविध उपक्रम राबवत असल्याने विद्यापीठाचे आभार मानले.महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अनिल पवार यांनी या कार्यक्रमाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला.सूत्रसंचालन अविनाश भामरे व प्रीती गुंजाळ या विद्यार्थ्यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ. आरती मोरे यांनी केले.या प्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मातोश्री शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कुणाल दराडे यांनी मार्गदर्शन केले.
फोटो 
एकलहरे : मातोश्री व्यवस्थापन महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळेत सहभागी पदाधिकारी.
थोडे नवीन जरा जुने