येवला तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांसाठी २७ कोटी ८७ लक्षचा निधी


 येवला तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांसाठी २७ कोटी ८७ लक्षचा निधी


येवला : पुढारी वृत्तसेवा
 राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला तालुक्यातील सिंचनाच्या एकूण ५९ कामासाठी २७ कोटी ८७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून येवला तालुक्यातील एकूण ३३ नवीन सिमेंट कॉंक्रीट बंधारे बांधण्यात येणार असून मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत २६ बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून येवला तालुक्यातील शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेच्या एकूण ३३ गेटेड सिमेंट बंधाऱ्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी एकूण २० कोटी ५३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या माध्यमातून २६ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशाकीय मान्यता प्राप्त झाली असून यासाठी ६ कोटी ३४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यामध्ये येवला तालुक्यातील खरवंडी १० बंधाऱ्यासाठी ७५ लक्ष ९ हजार, खरवंडी ११ बंधाऱ्यासाठी ६२ लक्ष ३३ हजार, चांदगाव १ बंधाऱ्यासाठी ७२ लक्ष ८७ हजार, चांदगाव २ बंधाऱ्यासाठी ७७ लक्ष ८४ हजार, अनकाई बंधाऱ्यासाठी ९३ लक्ष ६५ हजार, रहाडी ९ बंधाऱ्यासाठी ६० लक्ष ५६ हजार, रहाडी १० बंधाऱ्यासाठी ६५ लक्ष ६३ हजार, ममदापूर १३ बंधाऱ्यासाठी ५३ लक्ष ५७ हजार, ममदापूर १४ बंधाऱ्यासाठी ५३ लक्ष ५७ हजार, सोमठाण जोश गावठाण ८ बंधाऱ्यासाठी ६९ लक्ष २ हजार, सोमठाण जोश ९ बंधाऱ्यासाठी ५७ लक्ष २६ हजार, ममदापूर १ बंधाऱ्यासाठी ६० लक्ष ०८ हजार, ममदापूर २ बंधाऱ्यासाठी ६० लक्ष १६ हजार, ममदापूर ३ बंधाऱ्यासाठी ६२ लक्ष ६ हजार, खरवंडी १ बंधाऱ्यासाठी ५५ लक्ष ४० हजार, खरवंडी २ बंधाऱ्यासाठी ६१ लक्ष ७९ हजार, खरवंडी ३ बंधाऱ्यासाठी ६१ लक्ष ३४ हजार तर खरावडी ४ बंधाऱ्यासाठी ५८ लक्ष ८० हजार अशा एकूण १८ बंधाऱ्यांसाठी ११ कोटी ७३ लक्ष ८० हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. 


तसेच येवला तालुक्यातील खरवंडी ७ बंधाऱ्यासाठी  ६२ लक्ष ६ हजार, खरवंडी ८ बंधाऱ्यासाठी ६८ लक्ष २६ हजार, खरवंडी ९ बंधाऱ्यासाठी ५६ लक्ष ६६ हजार, रहाडी ३ बंधाऱ्यासाठी ६६ लक्ष २५ हजार, रहाडी ४ बंधाऱ्यासाठी ७० लक्ष ७७ हजार, रहाडी ५ बंधाऱ्यासाठी ६६ लक्ष ७१ हजार, रहाडी ६ बंधाऱ्यासाठी ५८ लक्ष ७९ हजार, रहाडी ७ बंधाऱ्यासाठी ५५ लक्ष ०६ हजार, रहाडी ८ बंधाऱ्यासाठी ५९ लक्ष ६७ हजार, ममदापूर १० बंधाऱ्यासाठी ६० लक्ष ४२ हजार, ममदापूर ११ बंधाऱ्यासाठी ५० लक्ष ६१ हजार,  ममदापूर १२ बंधाऱ्यासाठी ४८ लक्ष ७० हजार, सोमठाण जोश ५ बंधाऱ्यासाठी ७० लक्ष १० हजार, सोमठाण जोश ६ बंधाऱ्यासाठी ६२ लक्ष ७५ हजार, सोमठाण जोश ७ बंधाऱ्यासाठी ५२ लक्ष ६ हजार या एकूण १५ बंधाऱ्यासाठी ९ कोटी ८ लक्ष ९१ हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.


त्याचबरोबर मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून येवला तालुक्यातील २६ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी ३४ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. यामध्ये सि.कॉ.ब. दुरुस्ती डोंगरगाव-२, आडगाव रेपाळ, अंगनगाव, रास्तेसुरेगाव, सा.त. दुरूस्ती रेंडाळे, पा.त. दुरूस्ती पिंपळखुटे तिसरे, विसापुर-३ बंधाऱ्यासाठी १ कोटी ३१ लक्ष, गा. त. दुरुस्ती पिंपळखुटे तिसरे, गवंडगावपा, पा. त. पन्हाळसाठे, सा.त. अहेरवाडी, सि.कॉ. व गवांडगाव, सि.कॉ.ब अंदरसुल, सि.कॉ.ब निमगाव मढ बंधाऱ्यासाठी १ कोटी ५० लक्ष, पा.त.दुरुस्ती पातोडा (पठान नाला), ममदापुर, सि.कॉ.ब भारम, गा.त.दुरूस्ती नगरसुल, सा.त डोंगरगाव, भारम, नगरसुल बंधाऱ्यासाठी २ कोटी ३८ लक्ष तर पा. त. दुरुस्ती निमगाव मढ, गा.त दुरुस्ती गुजरखेडे, मातुलठाण, सि.कॉ. ब चिंचोडी, डोंगरगाव १, धामोडे बंधाऱ्यासाठी १ कोटी १३ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. या जलसंधारणाच्या विकासकामांमुळे येवला तालुक्यातील सिंचन क्षेत्रात अधिक वाढ होणार आहे.
थोडे नवीन जरा जुने