विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिवस उत्साहात साजरा
विद्या  इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

येवला : पुढारी वृत्तसेवा
 21 जुन हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो.  मागील वर्षी कोरोना महामारीमुळे सर्वत्र शाळा बंद असल्या कारणामुळे योगा डे ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला होता.. योगा दिनाचे औचित्य साधून
या वर्षी मुलांमद्धे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. नुसतेच योगा डे ला नाही तर योगा हा उपक्रम विद्या इंटरनॅशनल स्कूल वर्षभर चालूच ठेवत असते आणि विद्यार्थीपण तितक्याच जोमाने योगा चे प्रात्यक्षित करून वर्षभर सराव चालू ठेवत असतात.

वर्षभर शाळेचे क्रीडाशिक्षक मोईज दिलावर विद्यार्थ्यांचा नियमित सराव घेत असतात. जागतिक योग दिनानिमित्त क्रीडाशिक्षक मोईज दिलावर आणि किरण कुलकर्णी यांनी  शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितामध्ये योगाचे प्रात्यक्षित साजरे केले व  विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून सांगितले.या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत योगा डे साजरा केला..त्यात प्रामुख्याने ताडासन,वृक्षासन,त्रिकोणासन,मुख्य सुर्यनमस्कार,वज्रासन,तसेच श्वासाचे प्राणायाम अनुलोम विलोम,भस्त्रिका,ओंकार प्राणायाम,कपालभाती आणि अंतिमतः शवासन घेऊन योगा डे साजरा केला. यात प्रात्यक्षिकामद्धे सर्व शिक्षकवृंद कर्मचारी तसेच प्राचार्य सौ.शुभांगी शिंदे,संस्थेचे संस्थापक डॉ.राजेश पटेल,डॉ.संगीता पटेल यांनीही  उपक्रमात सहभागी होऊन योगा डे साजरा केला.
थोडे नवीन जरा जुने