सुदृढतेसह विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी करा योगा सावरगाव विद्यालयात जागीरदाराच्या संगीतमय योगावर थिरकली विद्यार्थ्यांची पावले

सुदृढतेसह विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी करा योगा
सावरगाव विद्यालयात जागीरदाराच्या संगीतमय योगावर थिरकली विद्यार्थ्यांची पावले

येवला : पुढारी वृत्तसेवा
योगा हा यशस्वी व निरोगी जीवनासह मानसिक व शारीरिक सुदृढतेसाठी गरजेचा आहे.यातून विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासह चांगल्या संस्काराची शिकवण मिळते.
या वयातच नित्यनियमाने योगा करून स्वतःला निरोगी ठेऊन अभ्यासासाठी देखील सक्षम व्हावे असे मार्गदर्शन योग शिक्षक योगेश जहागीरदार यांनी केले.
हिरवेगावर अन निसर्गसौंदर्य प्रांगण,व्यासपीठावर योगाचे प्रात्यक्षिक करणारी ब्रम्हाकुमारी सेवा केंद्राची टीम अन एका रांगेत तल्लीन होऊन सामूहिक योगात तल्लीन झालेले विद्यार्थी...असे नजरेत साठवावे असे दृश्य आज जागतिक योग दिनानिमित्त सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर दिसले..!
आज जागतिक योग दिनानिमित्त विद्यालयात येवला येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी नीतादीदी यांच्या मार्गदर्शनाखाली
योग शिक्षक योगेश जहागीरदार तसेच विना क्षत्रिय,सुनंदा क्षीरसागर,वर्षा बारे,अश्विनी बारे यांना निमंत्रित करण्यात आले होते.श्री.जहागीरदार यांनी तब्बल एक तास संगीत योगाचे वेगवेगळी आसने व प्रात्यक्षिके सादर करत विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली..योग हा यशस्वी व निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे.
मानसिक व शारीरिक सुदृढतेसाठी योगा तितकाच गरजेचा असून विद्यार्थ्यांनी या वयातच नित्यनियमाने योगा करून स्वतःला निरोगी ठेऊन अभ्यासासाठी देखील सक्षम व्हावे असे मार्गदर्शन जहागीरदार यांनी केले.या टीमच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगाची प्रात्यक्षिके करून आनंद घेतला.शिक्षक बांधव देखील योगात सहभागी झाले होते.विद्यालयाचे प्राचार्य शरद ढोमसे,पर्यवेक्षक व्ही.एन.दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्राचार्य ढोमसे यांनीही जीवनात योगाचे महत्व विशद केले.योगेश जहागीरदार व सर्व टीमने इंडियन आयडॉल आम्रपाली पगारे हिचेही तोंड भरून कौतुक केले. शिवाय शाळेचे देखणी इमारत,निसर्ग संपन्न परिसर व नियोजनाचे देखील कौतुक केले.

सावरगाव : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये योगा सादर करताना योगशिक्षक योगेश जहागीरदार व ब्रह्माकुमारी केंद्राच्या शिक्षिका
थोडे नवीन जरा जुने