येवल्यात काँग्रेसपक्षा तर्फे सरपण, चूल विकून व फुटाणे वाटून महागाईचा निषेध



येवल्यात काँग्रेसपक्षा तर्फे सरपण, चूल विकून व फुटाणे वाटून महागाईचा निषेध


येवला : पुढारी वृत्तसेवा
     येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तूवरील वाढवलेल्या जी.एस.टी.च्या विरोधात विचुंर चौफुली, येवला येथे सरपण, चूल विकून व महागाई मुळे फुटाणे वाटून आंदोलन करण्यात आले. 
     केंद्रातील भाजप सरकारचे चुकीचे धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर व जिवानशयक वस्तूवरील वाढवलेल्या जि.एस.टी. मुळे सामान्य माणसाचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. केंद्र सरकारने देशातील युवकांचा कोणताही विचार न करता घाई घाईने चालू केलेली अग्निपथ योजनेमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सर्व बाबीमुळे आज येवल्यात तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे महागाई वाढल्यामुळे फुटाणे वाटून महागाईचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. तसेच घरगुती गॅसचे वाढलेल्या किंमती मुळे प्रतिकात्मक पणे चूल व सरपण विकून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महागाई कमी झालीच पाहिजे, पेट्रोल, डिझेल व गॅसचे किंमती कमी करा, जि.एस.टी. रद्द करा तसेच हुकुमशाही नही चलेंगी. अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 
      यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, अण्णासाहेब पवार,  आबासाहेब शिंदे, अमित पटणी, विलास नागरे, बाबासाहेब शिंदे, मुकेश पाटोदकर, राजेंद्र गणोरे, गणपत शिंदे, सुकदेव मढवई, दत्तु  भोरकडे, दयानंद बेंडके, अक्षय शिंदे, श्रावण राजगिरे, नंदु घोटेकर, प्रविण पाटील, मच्छिंद्र गुडघे, बाळासाहेब घोटेकर, भागवतराव खराटे, केशव मढवई, शरद घोटेकर, रघुनाथ घोटेकर आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने