बैल धुण्यासाठी गेलेला तरुणाचा कुसुर येथील पाझर तलावात बुडून दुर्दैव मृत्यू

बैल धुण्यासाठी गेलेला तरुणाचा 
कुसुर येथील पाझर तलावात बुडून दुर्दैव मृत्यू 

येवला : पुढारी वृत्तसेवा

दिनांक 26 ऑगस्ट शुक्रवार रोजी बळीराजाचा बैलांचा महत्त्वाचा सण असलेला पोळा सणाला लावण्यात गालबोट लागले असून तालुक्यातील कुसुर येथे एका 32 वर्षीय तरुणाचा बैल धुण्यासाठी पाझर तलाव येथे गेल्यानंतर पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मधुकर उत्तम गायकवाड राहणार कुसूर्  असे या तरुणाचे नाव असून बैल पोळा सणाच्या दिवशी दुर्दैवी घटना घडल्याने कुसुर गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान परिसरातील पोहोनाऱ्या तरुणांच्या मदतीने दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे.
या घटनेची माहिती  पोलीस पाटील मनोहर गायकवाड यांनी पोलिसांना दिल्यानंतर
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मृतदेह बाहेर काढण्यासाठी ऋतिक उगले, जयवंत चव्हाण,अभिषेक चव्हाण, गुड्डू हिंगे यांच्या सह बाळासाहेब पवार, सरपंच संजय गायकवाड गोरख आबा पवार दीपक गायकवड पोलीस पाटील मनोहर गायकवाड यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने