लक्ष गुजराथी महाराष्ट्र टेनिस संघाचा कर्णधार म्हणून निवड



लक्ष गुजराथी महाराष्ट्र टेनिस संघाचा कर्णधार म्हणून निवड
येवला : पुढारी वृत्तसेवा

विद्या इंटरनॅशनल स्कूलचा खेळाडू लक्ष गुजराथी याचे मुंबई येथील राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावून महाराष्ट्र संघात संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.

सी.आय.एस.सी.ई. झोन 1 आणि झोन 2 आयोजित टेनिस स्पर्धा नुकत्याच मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन (कुपरेज) येथे दिनांक 25 ते 26 ऑगस्ट या कालावधीत पार पडल्यात..सदर स्पर्धेत (झोन 1 आणि झोन 2) या विभागातील मुंबई,रायगड,ठाणे,मुंबई उपनगरातील सर्व जिल्हे तसेच पुणे,नासिक,औरंगाबाद,अमरावती,
जालना,जळगाव,नागपूर येथील विविध खेळाडूंनी सहभाग घेतला.

 या स्पर्धेत लक्ष गुजराथी यांनी उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई येथील खेळाडू क्रीश मर्चंट यावर 6-1 तसेच उपांत्य सामन्यात पुणे येथी खेळाडू रियान मुजगुळे या खेळाडूंवर 6-2 असा विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

लक्ष यती गुजराथी याने सर्व्ह,व्हॉली,स्लाईस,ड्रॉप आणि स्मॅश अश्या विविध बाबींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिकली.. पुण्यातील राष्ट्रीय खेळाडू अर्जुन कीर्तने यावर अंतिम सामन्यात 6-2 अश्या फरकाने सामना जिंकून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आणि पुढील महिन्यात 26 ते 31 सप्टेंबर या कालावधीत पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी लक्ष गुजराथी याची महाराष्ट्र संघात प्रथम स्थानी निवड झाली आहे तसेच शाळेकडून पहिला राष्ट्रीय खेळाडू होण्याचा मान लक्ष याने मिळवला आहे .

लक्ष याला ऍक्टिव्हिटी हायस्कूलच्या प्राचार्य पेरिन बगली मॅडम,मनोज वैद्य सर व स्पोर्ट्स डायरेक्टर जुड सर याच्या हस्ते गोल्ड मेडल व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
लक्ष याच्या नेत्रदिपक कामगिरीबद्दल लक्ष याचे संस्थेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल डॉ.संगीता पटेल प्राचार्य सौ.शुभांगी शिंदे तसेच क्रीडाशिक्षक किरण कुलकर्णी,अभिलाष आहेर, मोईज दिलावर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील महिन्यात कलकत्ता येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
लक्ष शहरातील नवभारत क्रीडा क्रीडा मंडळ क्रीडांगणावर प्रशिक्षक किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतो. त्याच्या विजेतेपदावर नवभारत क्रीडा मंडळाच्या सर्व सभासदांनी अभिनंदन केले.
थोडे नवीन जरा जुने