येवल्यात शिवसेनेचे निदर्शन करत निषेध आंदोलन
येवला : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्यातून वेदांता व फॉक्सकॉन हे होऊ घातलेले मोठे उद्योग प्रकल्प गुजरात राज्यात पळविल्याच्या निषेधार्थ येवला तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे तीव्र निदर्शन करून निषेध आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे तालुकाप्रमुख रतन बोरणारे आदींच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय येथे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक जमवून शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीने शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 50 खोके महाराष्ट्राला धोके, 50 खोके एकदम ओके शिंदे- फडणवीस सरकार हाय हाय, जय भवानी जय शिवाजी, आवाज कुणाचा शिवसेनेचा उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है ! अशा विविध घोषणा देऊन शिवसैनिकांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला. यावेळी युवा सेनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवून शिंदे फडणवीस सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी बोलताना शिंदे- फडणवीस सरकारने महाराष्ट्र हित न बघता होऊ घातलेला प्रकल्प केंद्र व राज्य सरकार या दोघांनी गुजरातला पाठविला व महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली यामुळे खरे महाराष्ट्रव्द्वेशी कोण आहेत हे आता सामान्य जनतेला समजले असून महाराष्ट्रातील जनता या सरकारला कदापि माफ करणार नाही व त्याचा बदला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे उदगार काढले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख झुंजारराव देशमुख सभापती प्रवीण गायकवाड युवा नेते शरद पवार युवा सेना तालुकाप्रमुख अरुण शेलार शहर प्रमुख लक्ष्मण गवळी सारी अन्सारी माजी सभापती पुंडलिकराव पाचपुते छगनराव आहेर बाळासाहेब पिंपरकर चंद्रकांत शिंदे राहुल लोणारी धीरज परदेशी चंद्रमोहन मोरे विजय लोणारी मनोज रंधे गणेश पेंढारी अनंता आहेर महिला आघाडीचे शहर प्रमुख दिपाली नागपुरे कमलाबाई दराडे कोमल शिकलकर अशोकराव आव्हाड प्रवीण आहेर संजय सालमुठे भाऊराव कुदळ विजय गोसावी किरण ठाकरे मकरंद तक्ते मोहफिज अख्तार मयूर भांबरे साहेबराव बोराडे विकास गायकवाड जनार्दन शेलार विक्रम बोराडे तुकाराम पिंपरकर रामनाथ ढोमसे शेखर शिंदे प्रशांत जाधव भोरकडे बाबा आदी पदाधिकारी शिवसैनिक व युवा सैनिक निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रतिक्रिया:-वेदांता व फॉक्सकॉन ये दोन्हीही प्रकल्प महाराष्ट्र राज्यात झाले असते तर सुमारे एक ते दीड लाख तरुण युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता व राज्य विकासाच्या दिशेने पुढे सरसावले असते. दोन्ही प्रकल्प महाराष्ट्र राज्या बाहेर गेल्याने बेरोजगार तरुणांची नोकरीची मोठी संधी हुकली.
रतन बोरनारे , शिवसेना तालुकाप्रमुख येवला