अतिवृष्टी भागातील शेती पिकांचे सरसकट पंचनामे करा शिवसेनेची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे मागणी

अतिवृष्टी भागातील शेती पिकांचे सरसकट पंचनामे करा
शिवसेनेची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे मागणी

येवला  : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील अतिवृष्टीने खराब झालेल्या मका सोयाबीन कांदे कपाशी द्राक्ष डाळिंब आदी पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे करण्यात आली .
येवला तालुक्यातील पश्चिम व उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली असून ढगफुटी सदृश्य परिस्थिती यावर्षी निर्माण झाली परिणामी शेतात उभी असलेली मका सोयाबीन कांदे द्राक्ष व डाळिंब अधिक पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहेत. दोन दिवसांपूर्वी कातरणी आडगाव पाटोदा अधिभागामध्ये तर सगळीकडे पावसाने थैमान घातलेले होते. पाटोदा व सावरगाव मंडळामध्ये एकाच दिवशी सलग पावसाने 70 मिली मिटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.या सर्व परिस्थितीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री अंबादासजी दानवे हे येवला येथे आले असता तालुक्यातील अतिवृष्टीने झालेले नुकसान व वस्तुस्थिती त्यांनी समजून घेऊन तहसीलदार श्री प्रमोद हिले यांना ताबडतोब सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तालुक्यात पशुधनांची संख्या सुमारे 95000 हजार ते 100000 लाखापर्यंत आहेत. आत्तापर्यंत फक्त दहा हजार लस येवला तालुक्यासाठी उपलब्ध आहेत ही माहिती समजल्यावर हे शासन शेतकऱ्यांसाठी असंवेदनशील असुन शेतकऱ्यांशी यांना काही एक  नाहीत असं शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.येवला तालुक्यासाठी आवश्यक असणारी लस शासन स्तरावर पाठपुरावा करून उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही श्री दानवे यांनी दिली.
यावेळी विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे तालुकाप्रमुख रतन बोरनारे शहर प्रमुख राजेंद्र लोणारी धीरज परदेशी राहुल लोणारी चंद्रमोहन मोरे देविदास निकम दिनेश आव्हाड गणेश वडनेरे चेतन लोणारी नितीन संसारे भोरकडे बाबा किरण ठाकरे राहुल भांबरे मयूर वाळुंज आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने