परशूराम प्रतिष्ठान,येवला तर्फे नवरात्री निमित्त कुंकूम अर्चन कार्यक्रम संपन्न.

परशूराम प्रतिष्ठान,येवला तर्फे नवरात्री निमित्त कुंकूम अर्चन कार्यक्रम संपन्न.

येवला- पुढारी वृत्तसेवा
 येवल्यातील परशुराम प्रतिष्ठान तर्फे नवरात्रीनिमित्त विठ्ठल मंदिर सभागृहात कुंकूम अर्चनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
नवरात्रोत्सवातील विविध स्वरूपाच्या पुजाविधीमधील कुंकूम अर्चन या विधीला अत्यंत महत्व आहे. यानिमित्त जिल्हाभरात व येवला शहरात ठिकठिकाणी कुंकुम अर्चन विधी होत असताना समाजातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला.
विठ्ठल मंदिर संस्थान,येवला च्या सभागृहात देवीला कुंकवाचा अभिषेक करण्यात आला. वे.शा.सं अमित पाटील गुरुजी यांनी देवीचे सहस्त्र नाम पठण करून ह्या कार्यक्रमाचे पौरोहित्य केले.यावेळी कुंकूमार्चन विधीचे महत्व गुरुजींनी सांगितले या प्रसंगी समाजातील स्वाती सावरगावकर,विद्या धर्माधिकारी,सुषमा पाटील,प्रभा संत,गायत्री देशमुख,अर्चना सावरगावकर,शोभा पाटील,स्मिता कुलकर्णी,वृषाली जोशी,अनघा कुलकर्णी,दिपाली शेंडे,रजनी कुलकर्णी,सरिता सबनीस,अंजली कुलकर्णी,आरती पाटील,शोभा टोणपे,शुभदा कुलकर्णी,राजश्री कुलकर्णी,आसावरी जोशी,ज्योत्स्ना पाठक,सुशीला कुलकर्णी,जागृती कुलकर्णी,जयश्री टोणपे,सुनंदा कुलकर्णी तसेच दिलीप पाटील,सतिष संत,बाळासाहेब देशमुख,श्रीरंग सावरगावकर,अरविंद जोशी,विकास धर्माधिकारी,दिनेश शेंडे आदी समाजबांधव उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने