येवला तालुका पोलिस पाटील संघाची वृद्धाश्रमात साजरी केली दिवाळी...
येवला- पुढारी वृत्तसेवा
पोलीस पाटील यांनी शिरसगाव लौकी येथील वृद्धाश्रमात जाऊन दिवाळी साजरी केली त्यावेळी तेथील वृध्दांना दिवाळीचे फराळ,कपडे व धान्य वाटप करण्यात आले.
पोलीस पाटील हा गावातील दिनदुबळ्या लोकांना नेहमीच आधार देण्याचे काम करत आलेला आहे .आपण समाजातील वंचित लोक आहे त्याच्यात जाऊन दिवाळी साजरी करावी या उद्देशाने तेथे जाऊन लोकांना आधार देण्याचे काम पोलीस पाटील यांनी केले. शिवाजी महाराजांच्या काळात ही गावात पाटील हे दिनदुबळ्या , शोषित,पिडीत लोकांच्या पाठीमागे नेहमी खंबीर असायचे .आज पाटील की वंशपरंपरागत राहीली नाही . तरीही आज मदत करण्याची परंपरा ही कायम आहे म्हणून पोलीस पाटील यांचे महत्व कालही होत , आज आहे व उद्याही राहील . नवनाथ जर्हाड यांनी अशा प्रकारे आश्रमाला अन्नदान करावे.तसेच चांगला उपक्रम राबविला म्हणून पोलीस पाटील यांचे कौतुक केले.
सैगॠषी आश्रम येथे सौ.वदना राऊत यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला त्यावेळी गोपनीय शाखेचे संदिप सांगळे दादा, नवनाथ जर्हाड पाटील प्रमुख पाहुणे होते.चौधरीपाटील, रामनाथ कदम पाटील यांची भाषणे झाली.
नादेसर येथील सुनिल वाघ पाटील यांनी आम्ही नेहमी आश्रमाला मदत करू असे आश्वासन दिले.यावेळी बोराडे पाटील प्रितीताई दौडे, नितिन काळे पाटील ,उराडे पाटील,घुसळे पाटील , गांगुर्डे पाटील, भाऊसाहेब ठाकरे,निलेश वाघ, कोटकर पाटील, खांडेकर पाटील, पिंगट पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.