विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी धुळ्यात काळी भाऊबीज साजरी करत शासकीय धोरणांचा निषेध

विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी धुळ्यात काळी भाऊबीज साजरी करत शासकीय धोरणांचा निषेध
   धुळे दि 26,
   राज्य शासनाने विनाअनुदानित धोरणाचा अवलंब करत या राज्यात शिक्षकांवर अन्यायाची प्रक्रिया सतत सुरू ठेवली आहे असा विश्वास हजारो विनाअनुदानित शिक्षकांना झाला आहे, अशा शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन व स्टुडंट्स असोसिएशन या संघटनेने कायम लढा दिला असून हा लढा अनेक वर्षापासून सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 26 ऑक्टोबर रोजी धुळे शहरासह राज्यातील विविध शहरांमध्ये विनाअनुदानित शिक्षकांना काळा टिळा लावून व काळ्याफिती बांधून काळी काळी भाऊबीज साजरी करून अनोखे आंदोलन करण्यात आले.
   महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी विनाअनुदानित शिक्षकांना काळा टिळा लावून भाऊबीज ओवळण्यात आली.
      शासनाच्या विनाअनुदानित धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि मुंबई येथील आझाद मैदानावर बसलेल्या शिक्षकांच्या महाआंदोलनास पाठिंबा देण्यासाठी धुळे शहरात आज महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी शिक्षकांसह काळी भाऊबीज साजरी करून शासनाचे लक्ष वेधले.
      त्रुटी पात्र शाळा अघोषित शाळा नैसर्गिक वाढीव तुकड्या प्रस्तावित वाढीव पद व अंशतः अनुदानित शाळांवरील शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार 100% वेतन अनुदान मिळावे ,तसेच 2005 पूर्वी व 2005 नंतर नोकरीच लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी सदरचे आंदोलन करून काळी भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्यासह राज्य उपाध्यक्ष विवेक पाटील सर, राज्य संघटक चव्हाण सर, राज्य कार्यकारिणी सदस्य वसिम अन्सारी सर ,गुलाब ठोंबरे सर तसेच ए जी पाटील सर, कमलेश देवरे सर, एन डी पाटील सर महाजन सर एडवोकेट विवेक सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने