बकरी ईद' आणि 'आषाढी एकादशी'च्या सोहळ्यातून हिंदू मुस्लिम बांधवांचे एकोप्याचे दर्शन - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ



'बकरी ईद' आणि 'आषाढी एकादशी'च्या सोहळ्यातून हिंदू मुस्लिम बांधवांचे एकोप्याचे दर्शन - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ


येवला :- पुढारी वृत्तसेवा
 'बकरी ईद' आणि 'आषाढी एकादशी'चा योग एकाच दिवशी आला आहे. सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्याचे दर्शन यातून दिले आहे. मुस्लिम बांधवांनी आज कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या सोहळ्यातून हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन सर्व समाजाला झाले असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.


बकरी ईद निमित्ताने आज इदगाह मैदान येवला येथे विशेष नमाज अदा करण्यात आली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


यावेळी आमदार नरेंद्र दराडे,  प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, भोलाशेठ लोणारी, मकरंद सोनवणे, राजेंद्र लोणारी, निसार लिंबूवाले, सुभाष गांगुर्डे, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


ते पुढे म्हणाले की, 'ईद-उल-अजहा' तथा 'बकरी ईद' हा त्याग आणि समर्पणाचं प्रतिक असलेला सन आहे. ही 'बकरी ईद' सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येणारी ठरो. समाजात एकता, बंधुता, सौहार्दाची भावना वाढीस लागो, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी सर्वांना 'बकरी ईद'च्या शुभेच्छा दिल्या.
थोडे नवीन जरा जुने