शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार येवल्यातून होणार...

शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार येवल्यातून होणार....


येवला :  पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील फुटीर व गद्दार नेत्यांच्या विरोधातील पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात दिनांक आठ जुलै रोजी घेण्याचे ठरवले असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ही सभा नियोजित केली आहे. 

येवल्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते एडवोकेट माणिकराव शिंदे यांनी रात्री उशिरा शरद पवार यांच्या निरोपावरून मुंबई घाटात शरद पवार यांची मुंबई येथे बुधवारी सकाळी सकाळी भेट घेतली. यावेळेस झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी येवला येथून महाराष्ट्रातील सभेला सुरुवात करण्याचे ठरवले . एडवोकेट माणिकराव शिंदे हे भुजबळांमुळे पक्षातून बाहेर ठेवले गेले होते, राष्ट्रवादीतून बाहेर काढल्यावरही एडवोकेट शिंदे यांनी इतर कोणत्याही पक्षाशी घरोबा न करता पवारांशी एकनिष्ठ राहिले होते. या सभेची तयारी यांच्याकडून जोरदार प्रयत्नाने सुरू आहे .

भुजबळांसाठी येवल्यातील पहिली सभा येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शरद पवार यांनी घेतली होती, भुजबळांचा राजकीय पुनर्वसनासाठीची ही पहिलीच सभा येवल्यात होती आता त्यात भुजबळांविरुद्ध शरद पवार त्याच ठिकाणी सभा घेत आहे.
थोडे नवीन जरा जुने