येवल्यात शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांच्या फोटोस जोडो मारून निषेध आंदोलनयेवल्यात शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांच्या फोटोस जोडो मारून निषेध आंदोलन

येवला : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना येवला तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. येवला येथील तहसील कार्यालयाच्या आवारात किरीट सोमय्या यांच्या फोटोस शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने चपलेने जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ काल मराठी वृत्तवाहिनी लोकशाही न्यूज या चॅनलवर प्रसिद्ध झाला. किरीट सोमय्या यांचे हे कृत्य अशोभनीय असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाहीत. किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देऊन करण्यात आली.
 यावेळी शिवसैनिकांनी मुर्दाबाद, मुर्दाबाद, किरीट सोमय्या, मुर्दाबाद .जय भवानी, जय शिवाजी. आवाज कुणाचा, शिवसेनेचा ...उद्धव साहेब आगे बढो,हम तुम्हारे साथ है.. किरीट सोमय्या यांचे करायचे काय, खाली डोकं ,वर पाय ...अशा विविध घोषणा तहसील कार्यालय परिसरात देवून परिसर दणाणून सोडला.
यावेळी शिवसेना नेते संभाजी राजे पवार उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे झुंजार देशमुख शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरणारे शहर प्रमुख संजय कासार महिला आघाडी तालुकाप्रमुख सुमित्रा बोटे शहर प्रमुख दिपाली नागपुरे युवा सेना तालुका अधिकारी अरुण शेलार शिवसेना समन्वयक छगन आहेर माजी सभापती पुंडलिक पाचपुते बाजार समिती उपसभापती बापूसाहेब गायकवाड उपतालुकाप्रमुख चंद्रकांत शिंदे गणेश पेंढारी अनंता आहेर संजय सालमुठे विकी निकम रावसाहेब नागरे नितीन संसारे साहेबराव बोराडे ज्ञानेश्वर बुल्हे मोंटी मथुरे पप्पू भुसे परशुराम कदम प्रतीक जाधव ज्ञानेश्वर दोडे सोमनाथ शिंदे बाळासाहेब खानदेशी आशिष अंकाईकर शाम व्यापारी रामनाथ ढोमसे  दत्ता कोटमे सुखदेव भोरकडे आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने