स्वामी मुक्तानंद विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा

स्वामी मुक्तानंद विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा 

येवला : पुढारी वृत्तसेवा
         11 जुलै हा दिवस जगात जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगातील सर्वच देशात साजरा केला जातो त्यामागचा उद्देश लक्षात घेऊन आमच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयात कला विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात  प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या  प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करून करण्यात आली 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभागाचे प्रमुख श्री सुनील देवरे सर यांनी केले या निमित्ताने 
    कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सतिश पैठणकर होते आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून महत्व पटवून दिले वाढत्या लोकसंख्येला अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणुन शेती क्षेत्रात उल्लेखनीय आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून देशाचे उत्पन्न वाढविण्याचे आव्हान केले तसेच या दिनाचे महत्व प्रत्येक व्यक्ति पर्यंत पोहोचवणे असा संदेश आपल्या भाषणातून करण्यात आला 
प्रमुख पाहुणे म्हणून जुनियर कॉलेज चे उपप्राचार्य श्री अंबादास ढोले होते त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना छोटे कुटुंब सुखी कुटुंब मोठे कुटुंब तितक्या अडचणी व आरोग्य विषयक काळजी घेण्याचे मार्गदर्शन केले पर्यवेक्षक श्री ज्ञानेश्वर भागवत सर यांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन एक आदर्श नागरीक कसा तयार होईल या विषयी  मार्गदर्शन केले भूगोल विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक श्री आर बी सोनवणे यांनी लोकसंख्या वाढीचा ईतिहास पटवून दिला  भूगोल विषयाचे प्राध्यापक श्री वळवी सर यांनी आजच्या काळात लोकसंख्या वाढीचे परिणाम लक्षात घेऊन उदयोन्मुख भारतातील तरुण पिढीकडून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून स्किल इंडिया,स्टार्ट अप  इंडिया,मेक इन इंडिया या योजनांचे महत्व पटवून दिले तसेच मराठी विषयाचे प्राध्यापक शरद पाडवी यांनी हा नाश थांबवा भूमातेचा तनमन जळते आहे ही वसुंधरा जनसंख्येच्या  भाराने रडते आहे या गीतातून पर्यावरण रक्षण आणी भूमातेचे  संरक्षण करण्याचा संदेश दिला 
विद्यार्थी मनोगतात आफिया पठाण,ईशिता माथेकर,कमलाकर गोरे, प्रज्ञा निकाळे,ललिता गायकवाड,यांनी जागतिक लोकसंख्या दिन या विषयावर मनोगत  व्यक्त केले 
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री ढाकणे हिने केले तर आभार हर्षालिं झाल्टे हिने केले 
  याप्रसंगी कला विभाग प्रमुख श्री सुनील देवरे , विज्ञान विभाग प्रमुख श्री खैरनार आर टी ,क्रीडा संचालक जी जे  सोनवणे ,ज्ञानेश्वर माळी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख युवराज घनकुटेसर ,श्रीमती वैशाली कङलग , सारीका होगाङे मॅडम आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने