श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त नामदेव विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ



श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त नामदेव विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

येवला : पुढारी वृत्तसेवा

येथील शिंपी गल्ली मधील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात दर वर्षी प्रमाणे यंदाही  श्री संत शिरोमणी नामदेव महाराज  यांच्या ६७३ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त मंदिरात  शुक्रवार दिनांक ७ ते १५  जुलै दरम्यान श्री ग्रंथराज न्यानेश्वरी पारायण व हरिनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या निमित्त दररोज श्री ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी  सामूहिक पारायण,महिला मंडळ भजन,हरिपाठ,संगीतमय भागवत कथा,श्रीहरी कीर्तन व भजन आदीं कार्यक्रम संपन्न होत आहे.

सप्ताह प्रारंभ दिनी  सकाळी ७ वाजता श्री व सौ हेमंत भांबारे यांच्या हस्ते सपत्नीक  विधिवत पूजा व आरती करन्यात आली.
ह.भ.प.दीपक महाराज ढोकळे, ह.भ.प अरुण हाबडे व सहकारी राजेंद्र गणोरे,जानकीराम शिंदे यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.

 सप्ताह प्रारंभ प्रसंगी अध्यक्ष सुहास भांबारे,उपाध्यक्ष नंदकुमार लचके,चिटणीस प्रदीप लचके,नंदलाल भांबरे,रविंद्र हाबडे,कैलास बकरे,जयवंत खंबेकर, मुकेश लचके,राहुल भांबारे,अरविंद तूप साखरे,श्रीहरी भंबारे,गणेश,संतोष टिभे,प्रकाश खंदारे,रविंद्र करमासे, निलेश माळवे,पप्पू माळवे,सागर मोतीवले,पप्पू खंदारे,योगेश लचके,सिद्धेश शिंदे,तुषार भांबरे,शैलेश खंदारे,योगेश पा,थरकर महिला मंडळाच्या कार्यकर्त्या तसेच
आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

सप्ताह दरम्यान  दिनांक ७ ते १४ जुलै दरम्यान दररोज सकाळी ८:३० ते १२:३० ज्ञानेश्वरी पारायण,२ ते ४ महीला मंडळ भजन,दुपारी ४:३० ते ५:३० हरिपाठ ह.भ.प.दीपक महाराज ढोकळे, संध्याकाळी ७ ते ९ संगीतमय भागवत कथा ह.भ.प.भागवताचार्य श्रीकृष्णकृपांकित सागर महाराज आदींचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ७ ते ११जुलै रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचे रात्री ९ ते ११ कीर्तन, दिंनाक १२ जुलै रोजी गोरख महाराज कुदळ व दि.१३ रोजी दिपक महाराज ढोकळे यांचे रात्री ९ ते ११ 
 यांचे कीर्तन होणार आहे. 
 
शनिवार दिनांक १५ रोजी पहाटे ६ वाजता काकड आरती व हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.त्या निमित्त सकाळी १० ते १२ काल्याचे किर्तन होईल तसेच दुपारी ४:३० वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची व पालखी मिरवणूक,सत्कार सोहळा,दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी उपस्थीत राहून भक्ती रसाचा आनंद घ्यावा असे आवाहन समस्त शिंपी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे
थोडे नवीन जरा जुने