9 वा राष्ट्रीय हातमाग दिन येवल्यात उत्साहात साजरा.



9 वा राष्ट्रीय हातमाग दिन येवल्यात उत्साहात साजरा.
                                                               
येवला :  पुढारी वृत्तसेवा
 राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवल्यात बुनकर सेवा केंद्र मुंबई यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.येथील श्री चौंडेश्वरी माता मंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमाला विभागाचे प्रांताधिकारी  बाळासाहेब गाढवे साहेब,तहसीलदार  आबा महाजन,माजी नगराध्यक्ष बंडू पहीलवान क्षिरसागर,महाराष्ट्र शासन वस्त्र उद्योग धोरण समितीचे सदस्य मनोज दिवटे,नगरसेवक प्रमोद सस्कर,संत कबीर पुरस्कार प्राप्त शांतीलाल काका भांडगे,प्रादेशिक वस्त्र उपायुक्त खांडेकर साहेब,बुनकर सेवा केंद्र  पश्चिम विभागीय उपसंचालक जवाहरलाल,राष्ट्रीय हातमाग विकास निगमचे उपेंद्र बेहरे,विक्रम गायकवाड,रमेशमामा भावसार,मनोज भागवत,शिरीष पेटकर, जितेंद्र पहिलवान आदींसह मान्यवर उपस्थित होते.                                        दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला.प्रास्ताविक मेहूल लुनेचिया तर आभार प्रदर्शन गणेश खळेकर यांनी केले.आपल्या मनोगतात मनोज दिवटे यांनी नुकतेच राज्याचे वस्त्रोद्योग धोरण मधील तरतुदींची सविस्तर माहीती दिली.विणकर बांधव व भगिनींनी या वस्त्रोद्योग धोरणातील विमा योजना,उत्सव भत्ता,विज सवलत,धाग्यावरील अनुदान या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.अतीशय बिकट परिस्थितीत वाटचाल करत असलेल्या हातमाग व्यवसायाला  या वस्त्रोद्योग धोरणामुळे नक्कीच टिकुन राहण्यात,अधिक विस्तारण्यास मदत होईल.अधिकाधिक रोजगार निर्मिती करीता पुरक ठरेल.असे सांगितले.सर्वच मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून हातमाग दिनानिमित्त सर्व विणकर बांधवांना शुभेच्छा दिल्या.
थोडे नवीन जरा जुने