तिकडे सासुरवाडी ला खाल्ला धोंडा... इकडे चोरट्यांनी तोडला कोंडा...

तिकडे सासुरवाडी ला खाल्ला धोंडा...
इकडे चोरट्यांनी तोडला कोंडा...

येवला  : पुढारी वृत्तसेवा

येवल्यातील एका जावयाला सासुरवाडीला धोंडा खायला जाणे चांगलेच महागात पडले आहे . पारेगाव रोडवरील बाजीराव नगर येथील  बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. 

येवला शहर व परिसरात भुरट्या चोरट्याचे सत्र सुरू झाले आहे.  शहरातील बाजीराव नगर भागात नव्याने बांधकाम झालेल्या घरात राहणारे सुनील तुकाराम पोटे हे धोंडा खाण्यासाठी आपल्या सासरवाडीला चांदवड येथे गेले होते.
बंद घराचा फायदा उचलून चोरट्यांनी मंगळवार ते बुधवार च्या मध्यरात्री घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करत देवघरात ठेवलेले चांदीचे देव, व्हिडिओकॉन कंपनीचा एलसीडी, व रक्कम असा 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. दुसऱ्या दिवशी दूध देण्यासाठी आलेले शिवाजी काळे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी घरमालकांना फोन करून चोरीच्या घटनेबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी तातडीने घटनस्थळी  धाव घेत ठसे तज्ञ व श्वानपातकाला पाचारण करून  गुन्हा नोंदवून चोरीचा तपास सुरू केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पगार हे करीत आहे

 
थोडे नवीन जरा जुने