येवल्यात तरुणीचा फोटो लावून अघोरी विद्येचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघड केला प्रकार



येवल्यात तरुणीचा फोटो लावून अघोरी विद्येचा प्रयत्न 
 अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघड केला प्रकार

येवला : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे भारताचे चांद्रयान (तीन) चंद्रावर यशस्वीरित्या उतरलेले असताना तरुणीच्या फोटो वर अरबी भाषेत मंत्र लिहून आघोरी विद्येचा प्रयत्न येवला शहरात उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

बुधवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी येवला शहरातील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी शेजारील लिंबाच्या झाडाला एका तरुणीचा फोटो लावून अरबी भाषेतील चिठ्ठी मध्ये मंत्र लिहिलेले साहित्य परिसरातील नागरिकांना आढळून आले होते. 
याची तक्रार त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे केली होती.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना देखील या ठिकाणी पाचारण केले.  हा सर्व प्रकार जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन असून संबंधित अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने येवला शहर पोलिसांकडे केली आहे. 
याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे
उदय कुऱ्हाडे, आयुब शहा  आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान अरबी भाषेतील मंत्र असल्यामुळे येवला शहरात विविध चर्चेला उधाण आले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
थोडे नवीन जरा जुने