रक्षाबंधन साठी आलेल्या बहिणीची 2 तोळ्याची पोत चोरट्यांनी बस स्थानक परिसरातून लांबवली

रक्षाबंधन साठी आलेल्या बहिणीची 2 तोळ्याची पोत चोरट्यांनी बस स्थानक परिसरातून लांबवली

येवला : पुढारी वृत्तसेवा

 येवला शहरातील बस स्थानकातील भोंगळ व ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो, बोगस फेरीवाल्यांसह भुरट्या चोरांचा उपद्रव येथे नित्य नियमाचा झाला आहे. येथील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी असलेला तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही सुद्धा शोभेसाठीच बसवले काय असे बोलले जात आहे.

रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण , 
 या बहीण किती दूर असली तरी रक्षाबंधनासाठी ते आपल्या भावाच्या घरी येत असते. येवला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मोहारे यांची बहीण जानकी बडोदे या चांदवड येथे असतात त्या दिनांक 31 ऑगस्ट रोजी येवला बस स्थानक परिसरात आले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची पोत गर्दीचा फायदा घेत ओरबाडून पोबारा केला
ही बाब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने येवला बस स्थानक परिसरात धाव घेतली या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता केवळ एक दोनच कॅमेरे सुरू असून मुख्य कॅमेरा हा बंद असल्याने तो जाणून-बुजून बंद केला गेलाय का असा सवाल उपस्थित झाला आहे दरम्यान याप्रसंगी भाजपच्या वतीने तातडीने आकार प्रमुखांना निवेदन देण्यात आला असून सदरचे सीसीटीव्ही त्वरित सुरू करावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. 
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे राजेंद्र मोहरे, बडा शिंदे मिननाथ पवार, वीरेंद्र मोहरे, सचिन खरात, माणिक पवार, आधी पदाधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने