सामान्य जनांचा बहुजनांचा विकास म्हणजे परम वैभव दिलीपराव क्षिरसागर.


सामान्य जनांचा बहुजनांचा विकास म्हणजे परम वैभव
दिलीपराव क्षिरसागर.


येवला : पुढारी वृत्तसेवा

रा.स्व. संघाचे स्थापनेला आज 98 वर्षे पूर्ण झाली, शताब्दी कडे वाटचाल करणाऱ्या  जगातल्या या सर्वात मोठी संघटना असलेल्या रा स्व संघाला आपली शताब्दी साजरी करण्याचे नव्हे तर या भारतमातेला परम वैभवाकडे नेण्याचे ध्येय आहे.  संघ प्रार्थनेत म्हटलेले  परमवैभव म्हणजे केवळ आर्थिक विकास नाही तर या देशातला सामान्य माणसांचा, बहुजनांचा सामुहिक शक्तीद्वारे होणारा सर्वांगिण विकास म्हणजे परम वैभवाचा काळ असल्याचे प्रतिपादन रा स्व संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रसार प्रमुख श्री दिलीपराव क्षिरसागर यांनी येवला येथील विजयादशमी उत्सवात केले.  

संघाने आपल्या 98 वर्षात राष्ट्रीयत्व जागृत ठेवण्याचे काम केले. संघ काम हे प्रतिक्रियात्मक काम नाही तर राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणे, समूह धर्म निर्माण करणे हे संघाचे काम आहे.  98 वर्षात देशातल्या 85000 स्थानी दैनंदिन संघ शाखेचे माध्यमातून तर 175000 पेक्षा जास्त सेवा कार्यातून संघ हे अविरत करत आहे.
देशात हिंदूंचे जागरण झाले, प्रभु श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहिले  ही प्रसादचिन्हे आपण अनुभवत आहोत असे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगीतले.

तत्पूर्वी शहरातून सघोष संचलन संपन्न झाले. संचलनात पूर्ण गणवेशधारी सहभागी स्वयंसेवकांनी शहर वासियांचे लक्ष वेधुन घेतले.  संचलनात संघाचे गुरुस्थानी असलेला भगवा ध्वज घेतलेला स्वयंसेवक अश्वारूढ होता. यावेळी संचालनाचे ठिकठिकाणी फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले.  त्यानंतर शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री अविनाश शिंदे हे उपस्थित होते.  त्यांनी आपल्या मनोगतात संघ ही आज संपूर्ण विश्वाचा आधार असल्याचे सांगुन हा संघ विचारच भारतमातेला विश्र्वगुरू स्थान देईल हा विश्वास असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर तालुका संघचालक श्री मुकुंदराव
गंगापुरकर, सह संघचालक श्री दिनेश मुंदडा हे उपस्थित होते. 

संचलनात ज्येष्ठ स्वयंसेवकासह बाल स्वयंसेवकही सहभागी झाले होते.
थोडे नवीन जरा जुने