दांडियाचे अनोखे फ्युजनसह रिमिक्स गितावर रंगला लयबद्ध नृत्याविष्कार! येवल्यात कुणाल दराडे फाउंडेशनच्या स्पर्धेत शिवा,मोरया,राधामोहिनी ग्रुप विजेते
दांडियाचे अनोखे फ्युजनसह रिमिक्स गितावर रंगला लयबद्ध नृत्याविष्कार!
येवल्यात कुणाल दराडे फाउंडेशनच्या स्पर्धेत शिवा,मोरया,राधामोहिनी ग्रुप विजेते


येवला : पुढारी वृत्तसेवा

पारंपारिक केडिया- लेहंगा परिधान केलेल्या महिला-युवतींचा लयबद्ध नृत्याविष्कार..,हिंदी-मराठी गितांच्या रिमिक्सवर मनसोक्तपणे थिरकणारी पाऊले...गरबा आणि दांडियाचे अनोखे फ्युजन आणि जल्लोषपूर्ण वातावरणात,आंबे मात की जयचा निनादणारा जयघोष अशा धमाल वातावरणात येथे कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य दांडिया स्पर्धा रंगतदारपणे पार पडली...मनमाड येथील शिवा ग्रुपने प्रथम व मोहिनी ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकावला.येथील राधा मोहिनी ग्रुपने चतुर्थ विजेतेपद पटकावले...!
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील आसरा लॉन्स येथे कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित दांडिया-गरबा स्पर्धेने स्पर्धत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत दांडियाचा नृत्याविष्कार सादर केला.या जिल्हास्तरीय स्पर्धेत मनमाड,निफाड,श्रीरामपूर येथून संघ सहभागी झाल्याने स्पर्धा अधिक रंगतदार झाली.स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले.ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शिरीष नांदुर्डीकर अध्यक्षस्थानी होते तर कुणाल दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.तर मातोश्री शिक्षण संस्थेच्या संचालिका मीनाताई दराडे, प्रियंका काकड,स्त्री रोग तज्ञ डॉ.कविता दराडे,अनिता दराडे,ब्रम्हाकुमारी नीतादीदी, मनीषा तक्ते,राजश्री गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे,जयवंत खांबेकर,कल्पेश पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उस्फूर्त सहभागामुळे सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली स्पर्धा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती.विशेष म्हणजे स्पर्धेत राधाकृष्ण,मैत्री, इंडियन,कालिका महिला,मातोश्री आयुर्वेदिक महाविद्यालय,नम्रता,६० प्लस नम्रता,डान्स स्टार,नवदुर्गा,कुलस्वामिनी,त्रीजी,रिलाइंट्स, विनायक,रणरागिणी,नवरात्री रॉक्स,महात्मा फुले मगर,वैष्णवी,आर्यनिकेतन,राधा मोहिनी, शिवा,मोरया या २२ ग्रुपने सहभाग नोंदविला होता.महिलांच्या नेत्रदीपक अदाकारी व नृत्यासह थीम घेऊन दांडिया सादरीकरण झाल्याने स्पर्धा इतकी रंगत गेली की हजारांवर प्रेक्षक स्पर्धा संपेपर्यंत थांबून होते.
एरव्ही हातात दांडिया घेऊन नृत्य करणाऱ्या तरुणी या दृश्यांच्या पलीकडे जाऊन अतिशय नाविन्यपूर्ण फ्युजन देखील या स्पर्धेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाले.राधामोहिनी,गुज्जू रॉक्स,कालिका महिला,मोरया,शिवा,त्रीजी रॉक्स,इंडियन,मातोश्री आयुर्वेदिक,६० प्लस डान्सर स्टार आदी ग्रुपने केलेले नृत्याविष्कार डोळे दिपवणारा होता.उल्हासपूर्ण आणि उत्स्फूर्त वातावरणात स्पर्धा झाल्याने महिलांनी त्याचा पुरेपूर आनंद लुटला. 
● यांनी पटकावले बक्षिसे..!
सुंदरशी वेशभूषा अन दैत्य वधाचा देखाव्याची थीम घेऊन अप्रतिम आविष्कार करणाऱ्या मनमाड येथील शिवा ग्रुपने स्पर्धेचे पहिले १५ हजार रुपयांचे बक्षिस पटकावले.मनमाडच्या मोरया ग्रुपने दुसऱ्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे तर श्रीरामपूर येथील त्रीजी ग्रुपने तिसऱ्या क्रमांकाचे ७ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.येवल्यातील राधामोहिनी ग्रुपने ५ हजारांचे चौथे तर मातोश्री आयुर्वेदिक महाविद्यालयाने ३ हजाराचे बक्षीस पटकावले.
याशिवाय ओम पाटील याला बेस्ट किंग,काव्य ठक्कर हिला बेस्ट क्वीन तर निखिल व मेघा यांना उत्कृष्ट जोडीचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.नाशिक येथील सचिन शिंदे व अमृता गुजराथी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
●प्रेक्षकांवर बक्षीसांचा वर्षाव!
स्पर्धेला येवलेकरांनी उदंड प्रतिसाद दिल्याने हजारावर महिला व युवक स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी जमले होते.कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने या महिलांमधून लकी ड्रॉ काढून मिक्सर,कुकर,पंखा,इस्त्री,हेअर ड्रायर आदी तब्बल ५१ बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.या उपक्रमाला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सर्व विजेत्यांना कुणाल दराडे तसेच सौ.दराडे व फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या हस्ते रोख रकमेसह चषक देऊन सन्मानित करण्यात आले.सूत्रसंचालन संतोष विंचू व संजय शिंदे यांनी केले.विजय गोसावी,
मकरंद तक्ते,राहुल भावसार,डॉ.महेश्र्वर तगारे,भूषण शिनकर,योगेश सोनवणे,शिवाजी साताळकर, आत्मेश विखे,किरण कुलकर्णी,मंदार खैरे,सुमित गायकवाड,पवन लोणारी,अतुल घटे,गौरव पटेल,मंदार पटेल,किरण कुलकर्णी,सतीश ठोंबरे,भारत बोरसे,सुनील काटवे,व्यंकटेश दोडे,प्रतीक हेंबाडे,संजय गायकवाड,योगेश लचके,योगेश गंडाळ,अक्षय राजपूत,राहुल भाबारे,राजू वाडेकर,सुशांत हजारे,मोहफिज अत्तार,सिद्धेश धिवर आदींनी संयोजन केले.
●उत्सवप्रियता जपण्याचा प्रयत्न - दराडे
दिवाळीला रांगोळी,पतंगोत्सव,दसरा होळी,रंगपंचमी हे सर्वच सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्याची परंपरा शहराने जपली आहे.ही परंपरा अव्यातपणे सुरू राहावी,नव्या पिढीनेही शहराची जगप्रसिद्ध ख्याती जपावी तसेच महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. महिलांकडूनही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याने आम्हाला उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा मिळते.दांडिया स्पर्धेतील उस्फुर्त सहभागाने आयोजनाचा हेतू सफल झाला.दिवाळीत भव्य रांगोळी स्पर्धा ही आयोजित केली जाणार असून तालुक्यातील सर्व कीर्तनकार,प्रवचनकार व भजनी मंडळींचा संत पूजनाचा कार्यक्रमही फाउंडेशनच्या माध्यमातून घेतला जाणार असल्याचे यावेळी संस्थापक कुणाल दराडे यांनी सांगितले.
फोटो
येवला : कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे आयोजित दांडिया स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करताना कुणाल दराडे व फाउंडेशनचे पदाधिकारी.
थोडे नवीन जरा जुने