येवल्यात एस टी कर्मचाऱ्यांना प्रवाशाकडून मारहाण

येवल्यात एस टी वाहक व महिला अधिकारी ला प्रवाशाकडून मारहाण

येवला : पुढारी वृत्तसेवा


तिकीट देण्याच्या कारणावरून येवला आगारातील वाहक व स्थानक प्रमुख यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला असून आरोपींना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा उद्यापासून (२६ मे ) पासून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा एसटी महामंडळाच्या सर्व संघटनांनी दिला आहे याप्रकरणी येवला शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत अधिक माहिती अशी की येवला आगारात कार्यरत असलेले वाहक दिपक अलगट येवला शिर्डी मालेगाव अशी ड्युटी करत होते दरम्यान कोपरगावहून येवल्याकडे येत असताना विंचूर चौफुलीवर असलेल्या सिग्नलवर गाडी थांबलेली असताना एक अज्ञात प्रवाशी बसमध्ये बसला इथून तिकीट देता येत नाही त्यामुळे तुम्ही स्टँडवरून बसा अशी सूचना वाहक दीपक अलगट यांनी केली असता मला कोपरगाव इथून तिकीट द्या अशी मागणी सदर प्रवाशाने केली त्यानुसार वाहकाने तिकीट दिले बसने येवला स्टँडवर प्रवेश करताच इतक्या कमी अंतरासाठी मला तिकीट का दिले यावरून वाहकाशी वाद घालायला सुरवात करून मारहाण केली यात वाहकाचे कपडे फाटले वाहकाच्या खिशात असलेली शासकीय रक्कमही काढून घेतली वाहकाने आपला जीव वाचवत स्थानक प्रमुख यांच्या केबीनकडे धाव घेतली यादरम्यान सदर प्रवाशाने फोन करून काही अज्ञात महिला पुरुषांना स्टँडवर बोलून घेतले त्यांनी स्थानक प्रमुख यांच्या केबिनमध्ये मोठा गोंधळ घातला स्थानकप्रमुख अर्चना दाणी यांना मारहाण करत अवरच भाषेत शिवीगाळ करत महिला अधिकाऱ्याला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर हा सर्व जमाव येथून पसार झाला वाहक दीपक अलगट यांनी स्थानक प्रमुख यांच्या केबीनमध्ये आश्रय घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला अन्यथा विपरीत झाले असते अशी प्रतिक्रिया स्थानकावर असलेल्या प्रवाशांनी दिली यानंतर येवला आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन करत संबंधितावर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला मात्र प्रवाशांच्या हिताचा विचार करून काही वेळाने चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले दोषींना अटक होऊन कारवाई न झाल्यास उद्यापासून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा एसटीच्या सर्व संघटनांनी दिला आहे  याप्रकरणी येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते

येवला शहर पोलीस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे मात्र सदर कर्मचारी कधीही हजर रहात नसल्याचे दिसून आले आहे घटना घडली त्यावेळी सदर कर्मचारी हजर असता तर एवढ्या मोठ्या जीवघेण्या हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ एसटी कर्मचाऱ्यावर व महिला अधिकाऱ्यांवर आली नसती सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सुमारे दीड तासाने पोलीस आल्याने संशयितांना पळून जाण्यास वाव मिळाला असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे
थोडे नवीन जरा जुने