येवल्यातील पाच वर्षाच्या चिमूरड्याला चीरडणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यास पोलिसांना यश

येवल्यातील पाच वर्षाच्या चिमूरड्याला चीरडणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यास पोलिसांना यश 

येवला : पुढारी वृत्तसेवा 

 

सोमवार दिनांक 27 मे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराजवळील असलेल्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी जात असताना ५ वर्षाचा रुद्र समाधान पागिरे याला भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली होती .या धडकेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकल्या रुद्रा पगिरे याला अपघात करणारा हा निर्दयी वाहन चालक तसाच सोडून पळून गेला होता त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी येवला पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टर मालकाला येवले शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


 या घटनेमुळे संतप्त झालेल्या विठ्ठल नगर येथील रहिवाशांनी या अज्ञात वाहनधारकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी करीत गुरुवारी येवला शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.  यावेळी येवला शहर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी  या आरोपीचा शोध केला असून संबंधित वाहन हे ट्रॅक्टर असून (MH30 F 8267) ट्रॅक्टर चालक सागर दिलीप परदेशी याला ताब्यात घेतल्याचे सांगून योग्य ती कारवाई सुरू असल्याचे जमावाला सांगून शांत केले .
थोडे नवीन जरा जुने