शहर संस्थापक रघुजीबाबा यांचा यात्रोत्सव ७ मे मंगळवार पासून

शहर संस्थापक रघुजीबाबा यांचा यात्रोत्सव ७ मे 
मंगळवार पासून 

येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला शहर संस्थापक रघुजीबाबा यांचा यात्रोत्सव ७ मे 
मंगळवार पासून गुरुवार ९ मे पर्यंत साजरा होत आहे.
दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या आधी वा अक्षय तृतीयेला येणार्‍या मंगळवारी हा यात्रोत्सव साजरा केला जातो.
सोमवारी रात्री येथील रघुजीबाबाच्या गढीवर त्यांच्या वंशजांसह सर्व जातीतील युवक एकत्रित येतात. सारे युवक खांद्यावर कावडी घेऊन कोपरगावहून पायी गंगेचे पाणी आणतात.
 चैत्र महिन्यातील शेवटच्या मंगळवारी या वर्षी दि .  ७ मे मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता गंगादरवाजा भागातील खंडू वस्ताद तालीम जवळून कावाडीची व रघुजीबाबा
यांच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून निघणार आहे . 
बुधवारी दि . ८ मे रोजी सकाळी  महापुजेचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी दि . ९ मे रोजी सायं ७ वाजता  छबीना
मिरवणुकीने रघुजीबाबा यात्रा उत्सवाची सांगता होईल.


***********

सुमारे ३५० वर्षांपूर्वी रघुजीबाबांनी येवला शहर वसविले. पैठणी बनवणारे
कारागीर आणुन कच्चा माल पुरवणेसाठी व पक्का माल घेणेसाठी व्यापारी आणले .
पैठणीसाठी लागणारे विणकर,रंगारी सह कोष्टी  समाज शहरात आणला .
व्यापार्‍यांसह जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी रघुजीबाबांनी घेऊन येवला
वाढवले.
रघुजीबाबांनी मुस्लिमांसाठी मशिद उभारली. आजही पाटील मशिद म्हणून ही मशिद
ओळखली जाते.
शहराच्या चारही दिशेला चार दरवाजे उभारले गंगादरवाजा, नागडदरवाजा
अनकईदरवाजा, पाटोदादरवाजा या नावाने आजही ते ओळखले जातात. रघुजीबाबा
शहराचा कारभार जेथून चालवत ती पाटलांची गढी व शेजारीच पाटीलवाडा आजही ३५०
वर्षांच्या इतिहासाची साक्ष देत आहे.
येवला शहराचे संस्थापक रघुजीबाबा यांचे पाटीलवाडा परिसरातील पवित्र समाधी
मंदिरात दरवर्षी भाविक यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी येतात.


---------- 
थोडे नवीन जरा जुने