पाठीवरची कौतुकाची थाप गुणवत्ताना प्रेरणा देणारी! कुणाल दराडे : येवल्यात फाउंडेशनकडून दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचा


पाठीवरची कौतुकाची थाप गुणवत्ताना प्रेरणा देणारी!
कुणाल दराडे : येवल्यात फाउंडेशनकडून दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचा गौरव


येवला,ता.१२ : ग्रामीण भागातील व परिस्थिती नसताना विद्यार्थी झगडत व संघर्ष करून गुण मिळवितात,त्यांच्या या संघर्षाला प्रेरणा मिळावी आणि यातूनच भविष्यात चांगले क्षेत्र निवडून विद्यार्थी कायम टॉपवर रहावे ही प्रेरणा देण्याच्या सामाजिक हेतूनेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या संघर्ष गाथा येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतील असे प्रतिपादन कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुणाल दराडे यांनी केले.
येथील सामाजिक कार्यातील अग्रेसर असलेल्या कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंताच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या  माजी प्राचार्य अंजली एलमामे अध्यक्षस्थानी होत्या.तर श्री.कुणाल दराडे,डॉ.अशोक पटेल,
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दीपक गायकवाड,कार्याध्यक्ष अर्जुन घोडेराव,शिक्षक नेते गोरख कुळधर,आत्मा मलिक गुरूकुलाचे प्राचार्य तुषार कापसे,प्राचार्य गोरख येवले, प्राचार्य प्राची पटेल,फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक विकास गायकवाड,हारूण शेख,डॉ.सुजित एलमामे,एझोकम विद्यालयाचे नागरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.सरस्वती मातेचे पूजन व द्विपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील दहावी-बारावीचे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थी व पालकांचा यावेळी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबविल्याबद्दल आत्मा मलिक गुरुकुलाच्या वतीने कुणाल दराडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
आजचे विद्यार्थी उद्याचे डॉक्टर,इंजिनिअर आहेत.विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले की त्यांच्यात ऊर्जा निर्माण होते.ही ऊर्जा कुणाल दराडे फाउंडेशनच्या या सोहळ्यातून विद्यार्थ्यांना नक्की मिळेल असा विश्वास श्रीमती येलमामे यांनी व्यक्त केला.असे कौतुकाचे सोहळे आयोजित करणे काळाची गरज आहे.विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्याचे ज्ञान आणि दिशा यातून मिळते असा विश्वास आश्विनी सांगळे या विद्यार्थ्यांनिने व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी नेहमी वर्तमानात राहून भविष्याचा वेध घ्यावा,योगा-प्राणायाम करून स्वतला संकटाना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवावे,यासाठी सर्वोतोपरी मार्गदर्शन करत राहू.सामाजिक बांधिलकी बाळगत गेल्या तीन वर्षापासून फाउंडेशन पैठणी उत्पादक,महिला बचत गट, विविध स्पर्धातील विजेत्या महिला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव सोहळा घेतला
 जातो.तालुक्यातील जनता त्याला भरभरून प्रतिसाद देत असून फाउंडेशनच्या माध्यमातून जनहिताचे हे उपक्रम असेच सुरू ठेवले जातील असे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांनी सांगितले. 
यावेळी फाउंडेशनचे नवनियुक्त संचालक अमित अनकाईकर यांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन संतोष विंचू व संजय शिंदे यांनी केले.फाउंडेशनचे पदाधिकारी विकास गायकवाड,शिवाजी सताळकर,कल्पेश पटेल,जयवंत खांबेकर,योगेश सोनवणे,विजय गोसावी,हारून शेख,संदीप मोरे,अरुण गायकवाड,पवन लोणारी,मकरंद तक्ते,मयूर मेघराज,आत्मेश विखे,एजाज शेख,मंदार खैरे,सुमित गायकवाड,अमित अंकाईकर,संजय गायकवाड, प्रशांत जाधव,सिद्धार्थ धीवर आदीनी नियोजन केले.
फोटो
येवला : गुणवत विद्यार्थ्यांच्या सत्कराप्रसंगी कुणाल दराडे,अंजली एलमामे,डॉ.अशोक पटेल व पदाधिकारी
थोडे नवीन जरा जुने