जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचा विधानसभेच्या मतदानावर बहिष्कारचा इशारा

जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचा विधानसभेच्या मतदानावर बहिष्कारचा इशारा

सहाय्यक निबंधक कार्यालयाला ठेवीदारांनी घातला घेराव

येवला : पुढारी वृत्तसेवा

नाशिक व येवल्यासह अनेक ठेवीदारांच्या ठेवी मुदत पूर्ण होऊन देखील परत न मिळाल्यामुळे जनता नागरी सहकारी पतसंस्था विरोधात ठेवीदारांनी यापूर्वीच आमरण उपोषण केले होते मात्र अद्याप जनता नागरी पतसंस्थेचा संस्थापक दौलत ठाकरे, याच्यासह संचालक मंडळ व कर्मचारी हे मोकाट फिरत असून त्यांना अटक करून ठेवीदारांच्या ठेवी पुन्हा मिळाव्यात याकरता येवल्यातील ठेवीदार संघटनेने सहाय्यक निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालत निषेध व्यक्त केला . तसेच लवकरात लवकर आम्हाला  लवकरात लवकर ठेवी परत न मिळाल्यास आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने