येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करावे - मंत्री छगन भुजबळ
येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करावे - मंत्री छगन भुजबळ


येवला : पुढारी वृत्तसेवा
 येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. मंत्री छगन भुजबळ यांनी आज शिवसृष्टी प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.


यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दीपक लोणारी, प्रवीण पहिलवान, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, भगवान ठोंबरे, सुनील पैठणकर, भूषण लाघवे, सुमित थोरात, गोटू मांजरे  विकी बिवाल, सचिन सोनवणे,महेश गादेकर, नितीन आहेर, राकेश कुंभारे, आदित्य कानडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. प्रकल्पाच्या लोकार्पणाच्या दृष्टीने प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
थोडे नवीन जरा जुने