सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत येवलेकरांनी सुरू केली मी जबाबदार येवलेकर मोहीम
सध्या पावसाळ्याचे दिवस असून येवला शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे येवल्याच्या लोकसंख्येचा वाढता विस्तार पाहता त्यामागे नगरपालिकेची तोडकी स्वच्छता यंत्रणा यामुळे एवढा शहरात स्वच्छतेचा अभाव असून यावर मार्ग काढण्यासाठी डॉक्टर राजेश पटेल यांनी पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून येवल्यातील जागरूक नागरिकांना आव्हान केले होते यावेळी येवला मर्चंट बँक हॉल या ठिकाणी शंभरहून अधिक नागरिक एकत्र येऊन मी जबाबदार येवले कर ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला
याप्रसंगी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला सहकार्य करण्याबरोबर नागरिकांमध्ये जनजागृती करणे, घंटागाडी मध्येच कचरा टाकने . आपल्या घराप्रमाणेच परिसर स्वच्छ ठेवणे , नगरपालिकेमार्फत भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन करणे या सूत्राप्रमाणे ही मोहीम राबवली जाणार आहे
या मोहिमेसाठी स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, डॉ.संकेत शिंदे, कुणाल दराडे, डॉ एस के पाटील, एडवोकेट जुगल किशोर कलंत्री, प्रवीण बनकर सुहास भांबरे, धीरज परदेशी सचिन सोनवणे अनिरुद्ध पटेल, भूषण शीनकर,राहुल लोणारी योगेश सोनवणे आदीं सह सर्व स्तरातील नागरिक व जबाबदार येवलेकर उपस्थित होते