पुणे विद्यापीठाच्या वतीने कल्पना देवरे-शेलार यांना पीएच.डी. प्रदान

 पुणे विद्यापीठाच्या वतीने कल्पना देवरे-शेलार यांना पीएच.डी. प्रदान



येवला


येवला तालुक्यातील विखरणी येथील मराठी भाषा संशोधक कल्पना रखमा शेलार- देवरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मराठी विषयातील मानद डॉक्टरेट (पी एच. डी.) पदवी प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले पती कै सुनील खंडू शेलार यांच्या पाठिंब्यामुळेच आपल्याला हे यश मिळाल्याने ही पदवी त्यांना समर्पित केल्याची भावना कल्पना शेलार यांनी व्यक्त केली आहे मनमाड येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रमोद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  "मराठीतील स्त्री आत्मचरित्रांतील समाज दर्शन (इ. स.१९९०ते२०१८)" या विषयावरील प्रबंध कल्पना शेलार यांनी विद्यापीठास सादर केला. यावेळी बहिस्थ परीक्षक म्हणून सोलापूर विद्यापीठातील डॉ. महादेव देशमुख,अंतर्गत परीक्षक तथा पुणे विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे उपस्थित होते. या संशोधन कार्यात त्यांना त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार, निफाड कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश जाधव आदींचे मार्गदर्शन लाभले. कल्पना शेलार-देवरे या   नाशिक रोड येथील आनंद ऋषीजी विद्यालयात २५ वर्षापासून सहशिक्षिका या पदावर कार्यरत आहेत. आपली मानद डॉक्टरेट पदवी त्यांनी पती कै सुनील खंडू शेलार यांना समर्पित केली आहे त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला इतके मोठे यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या या यशाबद्दल आनंद ऋषिजी विद्यालयाचे संचालक मंडळ ,येवला तालुका पत्रकार संघ,सहकारी शिक्षक व पुणे विद्यापीठाच्या वतीने अभिनंदन  करण्यात आले आहे

थोडे नवीन जरा जुने