येवला वकील संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश गायकवाड तर सरचिटणीस पदी सचिन गायकवाड
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुका वकील संघाच्या झालेल्या निवडणुकीत एडवोकेट प्रकाश गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. येवला येथे जिल्हा न्यायालय व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन
होणेकामी ज्येष्ठ सदस्य माणिकराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गायकवाड यांनी १० वर्षे पूर्वी ते येवला वकील संघाचे अध्यक्ष असताना मोलाचे प्रयत्न केले होते. पी.एम
गायकवाड हे गेले ३७ वर्षांपासून येवला न्यायालयात वकीली करीत असून गेले १८
वर्षापासून ते नोटरी पदावर कार्यरत आहे.
वकील संघाची निवडणूक शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी शांततेत पार पडली. अध्यक्षपदी एडवोकेट प्रकाश माधवराव गायकवाड , सेक्रेटरी पदी एडवोकेट सचिन गायकवाड , उपाध्यक्ष पदावर एडवोकेट किशोर पगारे,खजिनदार-एडवोकेट संतोष शहा ,सदस्य म्हणून एडवोकेट रवी गायकवाड व एडवोकेट वासीम शेख आणी महिला सदस्य म्हणून एडवोकेट सारिका वसईकर या निवडून आलेल्या आहेत. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.