बिडिओनीं सोडले साचलेल्या पाण्यात गप्पी मासे

बिडिओंनी सोडले साचलेल्या पाण्यात गप्पी मासे

येवला : पुढारी वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र भारम येथे गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी भेट दिली.भेटीच्या वेळी त्यांनी गप्पी मासे पैदास केंद्रास भेट दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळच काही ठिकाणी पाणी साचलेचे त्यांचे निदर्शनास आले त्यांनी वैद्यकीय अधिकारी  डॉ.वाघमारे आरोग्य पर्यवेक्षक नागपूरे आरोग्य सहायक खरात यांच्या मदतीने तात्काळ गप्पी मासे पैदास केंद्रातून गप्पी मासे घेऊन
साचलेल्या पाण्यात सोडले.
डेंग्यू,चिकुनगुन्या, मलेरियाच्या जैविक नियंत्रणासाठी गप्पी मासे पाळणे हा प्रभावी उपाय असल्याचे 
पाटेकर यांनी सांगितले 
 डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतात गप्पी मासे हे अंडी खाऊन फस्त करतात असे डॉ वाघमारे यांनी सांगितले.भेटीच्या वेळी त्यांनी कुटुंब कल्याण कार्यक्रम, माता बाल संगोपन कार्यक्रम,राष्ट्रीय कीटकजन्यआजार नियंत्रण कार्यक्रम,क्षयरोग नियंत्रण, कुष्ठरोग निर्मूलन,अंधत्व निवारण कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाबरोबरच साथरोग नियंत्रण वयोश्री योजनांचा आढावा घेतला. पाटेकर यांनी मुख्यालयास सर्वांनी पूर्णवेळ उपस्थित राहाणे बरोबरच दप्तर अद्यावत ठेवणे व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र अंतर्गत व बाह्य परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत सुचना दिल्या तसेच आरोग्य कर्मचारी यांनी गावोगावी गप्पी मासे पैदास केंद्र निर्माण करून साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे बाबत सुचना दिल्या.


थोडे नवीन जरा जुने