येवला शहरात फटाके व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन 

येवला शहरात फटाके व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन 

येवला : पुढारी वृत्तसेवा


येवला नगरपरिषद येवला व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत येवला नगरपरिषद येवला येथे  मुख्याधिकारी  तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहरात फटाके मुक्ती व तसेच प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठ्या आवाजाचे फटाके वाजवू नये तसेच ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच दिवाळी प्रदूषण मुक्त करण्यासाठी येवला शहरात स्वच्छता विभागाकडून विशेष काळजी घेतली जाईल नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे यावेळी आवाहन मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित धीरज अलाई विजय शिंदे शाम निकम शशिकांत मोरे राजेंद्र निकम उज्वला अहिरे राजेश निकम संदिप बोढरे गौरव चुंबळे प्रभाकर वाघ खैरुणिसा पठाण सरस्वती तुंबारे आशा मोंढे शितल शेळके वरद पोटे अधिक कर्मचारी उपस्थित होते.



दिवाळी म्हणजे दिपोत्सव व मिठाईची देवाण घेवाण, मुलांचा उत्साह आणि आनंद म्हणजे फटाके.  चला तर या वर्षी आपल्या देशासाठी, आपल्या आरोग्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करूया. हे फटाके ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे मूळ कारण ठरतात. फटाक्‍यांच्या धुरामूळे हवेचे प्रदूषण वाढते आणि फुफ्फूसाचे आजार वाढतात. हे आजार या काळात खूप धोकादायक आहेत. त्याचा लहान मुलांवर, वृद्धांवर, गरोदर स्त्रियांवर विपरीत परिणाम होतो. आपणच आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची आपल्या माणसांची काळजी घ्यायला हवी म्हणूनच या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून फटाके मुक्त दिवाळी साजरी करूया


  तुषार आहेर मुख्याधिकारी
येवला नगरपरिषद येवला
थोडे नवीन जरा जुने