मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांची महेंद्र पगारे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन दिले धर्मांतर घोषणेचा कार्यक्रमाचे निमंत्रण
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला मुक्तीभुमीवर 13 ऑक्टोबर 2024रोजी रोजी धर्मांतर घोषणेचा वर्धापनदिन असल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो भीम अनुयायी मुक्तीभुमीवर येत असतात तसेच अनेक आंबेडकरी चळवळीतील नेते देखील येतात परंतु दरवर्षी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महेंद्र पगारे हे शहरातील शनीपटागंण येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात व शहरातील सर्व च मान्यवरांना एकत्र करून त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात समाजप्रबोधनाचा कार्यक्रम केला जातो तिथे अनेक नामवंत कवी गायक संगीतकार येत असतात मनोजभाई संसारे यांची जाहीर अभिवादन सभा घेतली जात होती परंतु मनोजभाई संसारे याच निधन झाले असून पक्षाचे पदाधिकारी या कार्यक्रमास येत असतात
यावेळेस महेंद्र पगारे यांनी मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांची अंतरवेली सराटी येथे भेट घेऊन सखोल चर्चा करून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले व त्यांनी देखील आनंदाने निमंत्रण स्वीकारून 13ऑक्टोबर रोजी दुपारी ते येवला शहरात त्याच आगमन होणार आहे मुक्तीभुमीवर जाऊन तिथे तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शनीपटागंण येथे जाहीर सभेत आंबेडकरी जनतेला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करणार आहे
जरांगे पाटील कार्यक्रमाला येणार म्हणून आंबेडकरी जनतेत अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहे
तालुक्यातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महेंद्र पगारे यांनी केले आहे
यावेळी महेंद्र पगारे विजय घोडेराव विनोद त्रिभुवन सुरेश खळे संजय भालेराव पिटर काळे शांताराम जाधव प्रविण कदम प्रसाद फापाळे महेश काळे दिनेश पागिरे विजय पगारे समाधान पगारे गणेश झाल्टे प्रशांत वाघ भिमराव खळे कडू झाल्टे मच्छिंद्र आढागंळे शरद आढागंळे बाळासाहेब आहेर श्रीधर आहिरे सतिश खळे मुकुंद पगारे राजु लहिरे युवराज पगारे बाळासाहेब आहेर कैलास पगारे महीला आघाडीच्या आशाताई आहेर नयनाताई सोनवणे सुंनदा काळे संगिता हिरे रंजना चव्हाण नंदिनी पगारे अनमोल आहेर याच्यासह अनेक भिमसैनिक उपस्थित होते