धडपड मंचचे वतीने शहरात ठिकठिकाणी लावण्यात आल्या भव्य राख्या
येवला । बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही याागची प्रत्येक बहिणीची मंगल मनोकाना असते. हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आई, बाबा कडुन खाऊ सर्वात पहिले कोणाला मिळणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना व्हाट्सअप, फेसबुक फोन किंवा चॅटद्वारे भेटुन एकत्र सण साजरा करण्याचा तात्पुरता असा आनंद उपभोगतात. त्यामुळे ह्या सणवारांचे महत्व कमी कमी होत चालले आहे. ह्या पारंपारीक सणाची आठवण रहावी व सणाचे एक मंगलमय वातावरण टिकुन राहण्यासाठी येवल्यातील सेवाभावी संस्था धडपड मंच कायमच प्रयत्नशील असते.
त्याच उद्देशाने येथील धडपड मंचचे वतीने सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी रक्षाबंधना निमित्त तीन भव्य राख्या बनविण्यात आल्या आहेत. सदरची राख्या संपुर्ण डिजीटल बनविण्यात आल्या असुन त्यास आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख ठिकाण असलेले मेनरोड, आझाद चौक व फात्तेबुरुज नाका येथे ह्या राख्या लावण्यांत आल्या असुन सदरच्या आकर्षक भव्य राख्या येणार्या जाणार्यांचे लक्ष वेधुन घेत आहे.