पाटोदा येथे बैलपोळा उत्साहात साजरा
मोहन कुंभारकर
पाटोदा -
श्रावण महिन्यातील दरवर्षी पारंपारिक पद्धतीने पिठोरी अमावस्येला साजरा होणारा बैलपोळा आज पाटोदा येथे मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी कृतज्ञतेचा आणि आनंदाचा क्षण आहे
परिसरातील शेतकरी बांधवानी आज आपल्या बैलांना सजवले आणि त्यांचेपूजन केले पारंपारिक रूढी आणि परंपरेनुसार परिसरातील शेतकरी वर्गाने बैलांना पहाटे अंघोळ घातली त्यांच्या शिंगणांना रंग, पितळी कवच फुले आणि झालर लावली. गळ्यात घुंगरांच्या माळा पाठीवर रेशमी झूल आणि पायांना घुंगरांनी भरलेली पैंजण घालून बैलांना नटवले , घरात पुरणपोळी खीर करंजी यासारखे पदार्थ बनवले आणि बैलांना गूळ हरभरा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला.
मात्र यंदा गेल्या काही दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे त्यामुळे यंदाच्या बैलपोळ्यावर पावसाचे आणि लंम्पी रोगाचे बऱ्याच प्रमाणात सावट असलेले दिसले त्यामुळे सर्जा राजा चीसंख्या बैलपोळ्याला कमी होती.
नेहमीप्रमाणे गावातून सर्व बैलांची मिरवणूक काढण्यात आली तसेच मारुती मंदिरासमोर सर्व बैल राजांना दर्शनासाठी आणण्यात आले व गावात पूर्णपणे फिरवून उत्साहाची सांगता करण्यात आलीप्रसंगी येवला तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय बहिर ,पोलीस हवालदार पल्हाळ ,पोलीस शिपाई जाधव व पाटोदा गावचे पोलीस पाटील मुजम्मिल चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला