*मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेतील स्मार्ट क्लास रूम एआय लॅब, कोडींग लॅब, रोबोटिक लॅबचे उद्घाटन*
*विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची - मंत्री छगन भुजबळ*
*एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे - मंत्री छगन भुजबळ*
नाशिक, दि. २३ ऑगस्ट:- सध्याच्या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लक्षणीय बदल होत आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात देखील या आधुनिक तंत्रज्ञानातून बदल होताना दिसत आहे. त्यामुळे चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असून एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शाळांमधील विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, व्हि.एन.नाईक संस्थेचे विश्वस्त अशोक नागरे, शाखा अभियंता संकेत चौधरी, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, शिक्षण अधिकारी भास्कर कनोज,गट शिक्षणअधिकारी प्रशांत गायकवाड , विस्तारअधिकारी वसंत गायकवाड, डॉ.श्रीकांत आवारे, सुनील पाटील, पांडुरंग राऊत, संदीप सांगळे, विजय आव्हाड, शिवाजी आव्हाड, सुनील आव्हाड, नारायण नागरे, राजेंद्र नागरे, विठ्ठल साबळे, आनंदा नागरे, आत्माराम सांगळे, शामराव गुजर, डॉ.मंगेश रायते, मुख्याध्यापक दिलीप कोथमिरे यांच्यासह डोंगरगावचे ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आज शिक्षण क्षेत्रात अधिक बदल होत असल्याने पारंपरिक पाटी-पेन्सिलच्या शालेय शिक्षणा सोबतच डिजिटल शालेय साधने वापरून मुलांना घडवणे ही काळाची गरज बनली आहे. आता स्मार्ट क्लासरूम म्हणजे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण देण्याची नवीन पद्धती आहे. या क्लासरूम मधून विद्यार्थ्यांना चित्रफिती, ऍनिमेशन, प्रोजेक्टर, संगणक यांचा वापर करून कठीण विषय व संकल्पना सोप्या आणि रोचक पद्धतीने शिकविकल्या जाणार आहेत. यामुळे मुलांचा अभ्यासातील आवड वाढून त्यांची सर्जनशीलता खुलून येईल. जगभर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे. रोबोटिक्स, हेल्थकेअर, शेती, उद्योग, वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. डोंगरगावातील विद्यार्थ्यांना देखील अशा जागतिक पातळीवरील ज्ञानाची ओळख या मॉडेल शाळेतून होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
ते म्हणाले की, एआय डिजिटल लॅबमुळे मुलांना डेटा, विचारप्रक्रिया, यंत्रमानव यांची प्राथमिक माहिती मिळेल. भविष्यकाळात ते कुठल्याही क्षेत्रात गेले तरी या शिक्षणाचा त्यांना मोठा उपयोग होईल.आजचे युग हे कोडींगचे युग आहे. मोबाईल अँप, संगणक सॉफ्टवेअर, वेबसाईट्स या सर्व गोष्टी कोडींगशिवाय शक्य नाहीत. आता मुलं आपल्या शाळेतूनच कोडींग शिकतील. यामुळे त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेत, समस्या सोडविण्याच्या पद्धतीत, गणित व तर्कशक्तीत प्रचंड सुधारणा होईल. गावातील शाळेतील मुले भविष्यात गुगल, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये काम करतील यात शंका नाही. रोबोटिक्स लॅबच्या माध्यमातून विद्यार्थी विज्ञानाचे नवे धडे व तंत्रज्ञान शिकतील. हे ज्ञान भविष्यात त्यांना संशोधक, अभियंता, शास्त्रज्ञ बनविण्यास मदत होणार आहे. हे उपक्रम राबविण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. परंतु या शिक्षणाच्या कार्यात गावकऱ्यांच्या सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगत ग्रामीण भागातील शाळांचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, मुलांच्या प्रगतीसाठी लागणाऱ्या निधीसाठी शासन कटिबद्ध आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी, चायना, जपानी, जर्मन अशा विविध आंतरराष्ट्रीय भाषांतून व सांकेतिक भाषेतून संवाद सादरीकरण केले.
*मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या कामांचे झाले उद्धाटन व भूमिपूजन*
स्थानिक विकास निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव ता. निफाड या शाळेतील स्मार्ट क्लास रूम एआय लॅब, कोडींग लॅब, रोबोटिक लॅब तयार करणे या कामाचे उद्घाटन (र.रु.२० लक्ष) स्थानिक विकास निधीतून डोंगरगांव प्राथमिक शाळा आवारात बहुउद्देशीय सभागृह बांधणे का यूजीमाचे भूमिपूजन (र.रु.२० लक्ष)