लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डकांच्या साहित्य शाहिरीचा वारसा पुढे घेऊन जाण्याची गरज : प्रा.शरद शेजवळ

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डकांच्या साहित्य शाहिरीचा वारसा पुढे घेऊन जाण्याची गरज : 

 प्रा.शरद शेजवळ

 



सामाजिक,राजकिय,सांस्कृतिक क्षेत्रात  नैतिकतेचा ऱ्हास होत असताना देशासमोरील ज्वलंत प्रश्न,जागतिकीकरण,उदारीकरण,खाजगीकरण,भांडवलशाही अर्थव्यवस्था,बेरोजगारी,शेतकरी कामगारांचे प्रश्न लोककलावंतांनी समजून घेणे आवश्यक असून ज्या पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डकांनी आपल्या साहित्य शाहिरी कवणातून जो विधायक व सम्यक विद्रोह केला तोच वारसा आजच्या साहित्य शाहिरीतून पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे उदगार लोककवी डॉ.वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा.शरद शेजवळ यांनी काढले.

  महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान व लोककवी डॉ.वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक संस्थेच्या वतीने येथील हुतात्मा स्मारकात आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोककवी डॉ. वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंती अभिवादन सभेत ते बोलत होते.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाहीर सुरेशचंद्र आहेर हे होते.नंदा पुणेकर,विश्वास कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शाहीर रामकृष्ण साळवे यांनी महाराष्ट्र गीत सादर केले.नीलिमा साठे,डॉ.भारत करिया, संपत खैरे, गुणवंत वाघ, शाहीर पंडितराव रिकामे, रफिक शाह यांनी गायन केले.संगीत साथ शाहीर विजय भोळे, रघुनाथ सोनवणे,सोनाली म्हरसाळे यांनी केले.
    ह्यावेळी विशेष सत्कार शाहीर प्रसाद अंतर वेलीकर,श्रीकांत श्रवण,राजेंद्र वावधने,शाहीर उत्तम गायकर, प्रा.डॉ.आरती साळवे,प्रा.कविता कटारे यांचे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी 
अनिल मनोहर,रत्नदीप जाधव,राजेंद्र वावधने,राजेंद्र सोनवणे,मनोहर नेटावटे,अशोक भालेराव यांनी परिश्रम घेतले.
सिन्नर,निफाड,चांदवड व नाशिक जिल्ह्यातील अनेक लोककलावंत याप्रसंगी उपस्थित होते.
लोककवी वामनदादा कर्डक आणि लोकशाहीर अण्णा भाऊसाठे यांचे क्रांती गीते प्रा.शरद शेजवळ, नीलिमा साठे,मनोहर नेटवटे,गुणवंत वाघ यांनी सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर नेटवटे,सूत्रसंचालन सचिन भालेराव, अशोक भालेराव,आभार रवी बराथे यांनी मानले.
कार्यक्रमास युवा,युवती,जेष्ठ वृद्ध कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने