अखेर त्या बुजलेल्या विहिरीचा पंचनामा झाला…
अतिवृष्टीमुळे विहीर, मोटार व विजेचे साहित्य उद्ध्वस्त
येवला
अतिवृष्टी मुळे वाघाळे येथील शेतकरी भाऊसाहेब जगन्नाथ सोमासे यांच्या शेतातील विहीर नाला बंडिंग फुटल्याने पाणी, चिखल, माती व दगडगोटे थेट विहिरीत कोसळून विहीर पूर्णपणे बुजली आहे.
या विहिरीचा पंचनामा प्राधान्याने करून भरीव नुकसानभरपाई देण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. मंत्री भुजबळ यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला. पण पिकाचे नुकसान व विहिरीचे नुकसान या वेगळ्या बाबी असल्याने नसल्याने शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिला असता, मात्र विशेष बाब म्हणून विहिरीच्या अनुदानातून मदत मिळावी, असे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले.
असे झाले नुकसान
विहीर पूर्णपणे बुजल्याने अंदाजे नुकसान : ₹80,000
मोटार, विद्युत जोडणी व पाईप साहित्याचे नुकसान : ₹20,000
एकूण नुकसान : ₹1 लाख
**************
“शेतकऱ्याच्या विहिरीची संपूर्ण पुनर्बांधणी व विद्युत पंप-पाईप जोडणी करून त्याला रब्बी हंगामासाठी उभे करणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करू.”
— भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती
****************