भारतीय जनता पार्टीच्या वतीने येवल्यात स्वच्छता अभियान
येवला:
भारतीय जनता पार्टीच्या येवला शहर मंडलच्या वतीने 'सेवा पंधरवडा' अभियानांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त शहरात स्वच्छता अभियान आणि प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येवला नगरपरिषद आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.
येवला येथील हुतात्मा स्मारक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच येवला नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी भाजपा नाशिक उत्तर जिल्हा महामंत्री आनंद भाऊ शिंदे, भाजपा शहराध्यक्ष मीननाथ पवार, सरचिटणीस चेतन धसे, तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधाकर तात्या पाटोळे आणि श्रावण दादा जावळे यांची उपस्थिती होती. याव्यतिरिक्त, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल शहराध्यक्ष आबासाहेब सुखासे, सांस्कृतिक सेल अध्यक्ष महेश भाऊ वडे, कामगाराघाडीचे शहराध्यक्ष अशोक भाऊ गुज्जर, आणि विनकर आघाडीचे अध्यक्ष निलेश भाऊ परदेशी यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
माजी शहर सरचिटणीस गणेश भाऊ खळेकर, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष श्रीकांत भाऊ खंदारे आणि सरचिटणीस अमित भांबरे तसेच दीपक भाऊ काथवटे उपस्थित होते. महिला आघाडीतून भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक सौ. पुष्पाताई गायकवाड, उत्तर महाराष्ट्र महिला मोर्चा ओबीसी आघाडी अध्यक्ष सौ. रत्नाताई गवळी आणि जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस सौ. अनुपमाताई मढे सहभागी झाल्या होत्या.
यासोबतच, येवला भाजपा वैद्यकीय आघाडी शहराध्यक्ष डॉ. रोहन भाऊ पाटील, शहर उपाध्यक्ष अमोल भाऊ पांगुळ आणि भीमा भाऊ मांजरे, चिटणीस अमोल शिंदे, अनुसूचित जाती मोर्चा येवला शहराध्यक्ष सचिन भाऊ साबळे आणि बूथ प्रमुख अमोल भाऊ सपकाळ यांच्यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.